प्रत्येकालाच फिट आणि सुंदर दिसायचे असते. तंदुरुस्त शरीर मिळवण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि निरोगी आहार घेणे अतिशय आवश्यक आहे. मात्र असे शरीर मिळवण्यासाठी लोक कधी काय करतील याचा काही नेम नाही. फिट होण्यासाठी लोक असे काही करतात ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. नुकतीच दक्षिण आफ्रिकेत एक घटना घडली आहे. येथील एका महिलेनेही वजन कमी करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली.
द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार अविवे मॅझॉसिवे ही महिला सध्या खूपच चर्चेत आहे. दक्षिण आफ्रिकेत राहणारी ही महिला आपल्या स्तनांच्या आकाराबाबत खूपच चिंतेत असायची. इतकंच नाही तर तिला स्तनांची शस्त्रक्रिया करून त्यांचा आकारही लहान करायचा होता. मात्र ही शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला तिचे वजन कमी करणे अतिशय आवश्यक होते. बॉडी मास इंडेक्स कमी झाल्यानंतरच ती शास्त्रक्रियेस पात्र ठरली असती.
आठ वर्षांपासून खात होती स्वतःचेच केस; पुढे जे झालं ते पाहून तुम्हीही…
या महिलेने इंटरमिटंट फास्टिंगच्या माध्यमातून तब्बल १२ किलो वजन कमी केले. मात्र यानंतर तिचे वजन कमी होत नव्हते. अशावेळी काय करावे हे तिला समजत नव्हते. यानंतर तिच्याकडे एकच पर्याय शिल्लक राहिला होता. ती तिच्या खाण्यावर नियंत्रण मिळवण्यास अपयशी ठरत होती. यामुळे तिने तिचे दात शिवण्याचा निर्णय घेतला.
जून २०२२ मध्ये तिने आपल्या दातांवर स्लिमिंग तार बसवले. हे एकप्रकारे दातांवर लावण्यात आलेल्या ब्रेकरसारखे असते. या तारांची बांधणी अशाप्रकारे केली जाते की संबंधित व्यक्ती आपले पूर्ण तोंड उघडण्यास असक्षम असते. यानंतर ती व्यक्ती मोठे घास चावू शकत नाही. विशेष म्हणजे या पर्यायाचा अवलंब केल्यानंतर अविवेने तब्बल १४ किलो वजन कमी केले. यानंतर तिने टिकटॉक या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडीओच्या माध्यमातून या घटनेची माहिती दिली.
दातांवर अशाप्रकारच्या तारा बसवल्यानंतर अविवे फक्त द्रव पदार्थच खाऊ शकत होती. यावेळी ती दही, सूप, इत्यादी पदार्थांचे सेवन करायची. या तारा काढून टाकल्यानंतर तिने सर्वप्रथम एक बर्गर खाल्ला. परंतु यासाठीही तिला काही दिवस वाट पाहावी लागली. कारण तब्बल सात आठवडे तिचे दात या तारांनी बांधलेले असल्यामुळे तिच्या जबड्याचे स्नायू लगेच उघडत नव्हते.