महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे नेटकऱ्यांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. जगभरातील वेगवेगळ्या गोष्टींवर सातत्याने ट्विटरवरुन व्यक्त होणारे आनंद महिंद्रा हे सोशल नेटवर्किंगवरील आघाडीच्या नावांपैकी एक आहे. अनेकदा आनंद महिंद्रा वेगवेगळ्या व्यक्तींच्या कामाचं कौतुक करताना, त्यांना प्रोत्साहन देतात दिसतात. आनंद महिंद्रा त्यांच्या मजेशीर ट्विटमुळे दररोज चर्चेत असतात. सध्या त्यांचे आणखी एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. दरवेळेप्रमाणे त्यांचे हे ट्विट लोकांची मने जिंकत आहे.

काही दिवसांपूर्वी एका ट्विटर युजरने एक्सयूव्ही७०० (XUV700) सह स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यावेळी त्याच्या फोटोमध्ये त्या व्यक्तीच्या गाडीवर फुलांचे हार दिसत होते. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांना टॅग करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘१० वर्षांच्या मेहनतीनंतर ‘महिंद्रा एक्सयूव्ही७००’ विकत घेतली. सर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.’ दरम्यान, खुद्द आनंद महिंद्रा यांनी या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर देऊन पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत.

रस्त्यावरील भारताच्या आकाराचा खड्डा पाहून आनंद महिंद्रांनाही बसला धक्का; फोटो पोस्ट करत म्हणाले…

त्या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘धन्यवाद पण तुम्हीच आहात ज्यांनी महिंद्राच्या वाहनाला तुमची पहिली पसंती बनवून आम्हाला आशीर्वाद दिला आहे.’ त्या व्यक्तीचे अभिनंदन करताना ते पुढे म्हणाले की, तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला हे यश मिळाले आहे. ‘हॅपी मोटरिंग’.

यानंतर आनंद महिंद्रा यांचे हे ट्वीट तुफान व्हायरल झाले आहे. सर्वच लोक त्यांच्या नम्रतेचे कौतुक करत आहेत. परंतु असे पहिल्यांदाच झालेले नाही. याआधीही अनेकवेळा आनंद महिंद्रा यांनी आपल्या वागणुकीने लोकांची मने जिंकली आहेत.

Story img Loader