जवळपास सहा महिन्यांहून अधिक काळ अंतराळात व्यतीत केल्यानंतर नासाचे अंताराळवीर ए.जे. फ्यूस्टेल यांना जमीनवर चालणं अवघड गेलं. ए.जे. यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक लहान व्हिडिओ पोस्ट केला आहे जिथे त्यांना दोन पावलंही चालणं अवघड होत असल्याचं दिसून येतं होतं.

स्पेस स्टेशनमध्ये जवळपास १९७ दिवस व्यतीत केल्यानंतर ते पृथ्वीवर आले. मात्र मोठा काळ पृथ्वीपासून दूर राहिल्यानंतर त्यांना इथल्या वातावरणाशी जुळवून घेताना काही कष्ट पडले. अंतराळातून परतल्यानंतर सुरूवातीचा काही काळ चालताना त्रास होत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येतं होतं.

५ ऑक्टोबरला हा व्हिडिओ चित्रीत करण्यात आला होता. यात ए.जेना काही पावलं चालतानाही अडखळायला होत होतं. डॉक्टरचा एक चमू त्यांच्यावर उपचार करत होता. ए.जे.नी शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

एका अंतराळवीराचं आयुष्यही खूप खडतर असतं त्यांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, बऱ्याचदा या गोष्टी सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाही, मात्र तुमच्या तब्येतीत लवकरच सुधारणा होतील असं म्हणत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Story img Loader