हत्ती दारू पितात असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार आहे कां? पण हे खरं आहे. या धक्कादायक प्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल होणारा हा फोटो ओडिशाच्या जंगतील असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोनंतर अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
नेमके काय घडले?
ओडिशामध्ये अजब प्रकार घडला आहे. येथील केओंझार जिल्ह्यातील पटना वन परिक्षेत्राच्या जंगलात काही हत्तींनी भांड्यात ठेवलेली कच्ची दारू पाणी म्हणून प्यायली. काहीवेळानंतर हे हत्ती गाढ झोपी गेले. त्यांनी थेट खाली डोकं वर पाय करत यांनी थेट जमीन गाठली. या गाढ झोपलेल्या हत्तींना उठवण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक प्रयत्न केले, पण हत्ती काही उठले नाही.
देशी दारू पिऊन तब्बल २४ हत्तींना गाढ झोप
ओडिशामध्ये महुआ झाडाच्या फुलांपासून वाईन आणि देशी दारू सुद्धा बनवली जाते. केओंझारमधल्या गावातील लोकांनी जंगल क्षेत्रात महुआची फुले मोठ्या कुंड्यांमध्ये देशी दारू बनवण्यासाठी भिजवून ठेवली होती. सकाळी गावकरी दारू बनवण्यासाठी पोहोचले असता त्यांना भांडी तुटलेली आणि त्यातील पाणी गायब झालेले दिसले. घटनेचा शोध घेतला असता गावकऱ्यांना काही अंतरावर २४ हत्ती जमिनीवर झोपलेले दिसले. महुआच्या फुलांचे पाणी गायब होते. त्यावेळी हत्ती हे नशेचे पाणी पिऊन झोपले असल्याचा अंदाज गावकऱ्यांना आला.
आणखी वाचा : अजबच! अंगावर नाक उगवलं आणि नंतर शस्त्रक्रीया करुन तोंडावर लावलं; या वैद्यकीय प्रयोगाची सर्वत्र चर्चा
ग्रामस्थांनी या हत्तींना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र, हे हत्ती काही केल्या उठत नव्हते, शेवटी ढोल-ताशा वाजवण्यात आल्यावर हे २४ हत्ती जागे झाले. यानंतर संबंधित घटनेची वनविभागाला माहिती देण्यात आली. गावकऱ्यांनी साठवलेले महुआचे पाणी पिऊनच हे हत्ती पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत गेल्याचा संशय वनाधिकाऱ्यांना आहे.
दरम्यान, हत्तीची आरोग्य तपासणी केली असता. दारूचा या हत्तींच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम झालेला आढळून आला नाही.