उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा एकहाती सत्ता सत्ता मिळवणं कठीण आहे. मात्र योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने करून दाखवलं. उत्तर प्रदेश विधानसभेत ४०३ जागा असून पक्षांना बहुमतासाठी २०२ सदस्यांचे संख्याबळ लागेल. बहुतांश मतदानोत्तर अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसला मात्र उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला असून जनतेने प्रियंका गांधी यांना नाकारलं आहे. समाजवादी पक्षाने मात्र भाजपाला चांगली लढत दिल्याचं दिसत आहे. मात्र सत्तेत येण्याची त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव सुरु झाला आहे. भाजपाच्या विजयानंतर सपा, बसपा आणि काँग्रेसवर नवनवीन मीम्स येत आहेत. इतकंच काय तर नेटकऱ्यांनी शिवसेनेलाही सोडलं नाही. हे मीम्स इतके मजेशीर आहेत की वाचून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता येत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लखनऊमधील कार्यालयाबाहेर होळी खेळत सेलिब्रेशन केलं.