सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक घटना व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिहारमधील एका व्यक्तीचा धावत्या रेल्वेमधून पडल्यामुळे हात तुटला आहे. पण हात तुटल्यानंतर या व्यक्तीने असं काही केलं आहे. जे पाहून आणि वाचून अनेकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर जिल्ह्यात चालत्या ट्रेनमधून पडल्यामुळे हात तुटलेल्या व्यक्तीचं नाव सुमन कुमार यादव असं आहे. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी रात्री सुलतानगंज रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. ज्यामध्ये फुली डुमर गावातील सुमन कुमार यादव नावाचा व्यक्ती रेल्वेतून पडल्यामुळे त्याचा हात तुटला.
शिवाय या अपघातानंतर सुमन कुमार यादव हा तुटलेला हात घेऊन रुग्णालयाच्या दिशेने धावत गेल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं. सुलतानगंज रेल्वे पोलिस स्टेशनच्या स्थानिक जीआरपी कर्मचाऱ्यांनी हात तुटलेल्या व्यक्तीची भेट घेतली आणि त्याला सुलतानगंज येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना चांगल्या उपचारासाठी भागलपूर येथील जेएलएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये पाठवल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही पाहा- महिलेला किस करुन पोलीस कारमध्ये बसवणं पडलं महागात, VIDEO व्हायरल होताच पोलीस निलंबित
दरम्यान, धावत्या ट्रेनमधून पडलेल्या आणि हात गमावलेल्या व्यक्तीवर आम्ही उपचार करुन त्याला वाचवलं असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आम्ही पीडितेच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती दिली आहे. अशी माहिती जीआरपी सुलतानगंजचे एसएचओ यांनी दिली.