Pink Dolphine Viral Photos : समुद्रातील जीवांबद्दल अनेकांना फार आकर्षण असते. कारण समुद्रात आढळणारे अनेक जीव हे आपण आयुष्यात यापूर्वी कधीही पाहिलेले नसतात, त्यामुळे ते पहिल्यांदा पाहताना खूप आश्चर्यचकित व्हायल होते. यात समुद्रातील डॉल्फिन अनेकांसाठी आकर्षणाचा भाग असतो. त्यामुळे एकदा तरी डॉल्फिन पाहण्याची अनेकांची इच्छा असते. काहींनी प्रत्यक्षात डॉल्फिन मासा पाहिलादेखील असेल, पण तुम्ही कधी दुर्मीळ गुलाबी डॉल्फिन पाहिला आहे का? नसेल तर सोशल मीडियावर गुलाबी डॉल्फिनचे काही फोटोज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, त्यामुळे गुलाबी साडीनंतर आता सोशल मीडियावर गुलाबी डॉल्फिनची चर्चा रंगलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोटोंमध्ये दुर्मीळ गुलाबी डॉल्फिन समुद्रात पोहताना दिसत आहे. डॉल्फिन हा मानवानंतर जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. डॉल्फिन जितका हुशार आहे तितकाच दुर्मीळदेखील आहे. त्यामुळे डॉल्फिन पाहायला मिळणे हा अनेकांसाठी फार कुतूहलाचा क्षण असतो. यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत डॉल्फिनचे अतिशय दुर्मीळ रूप पाहायला मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा गुलाबी डॉल्फिन अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना किनाऱ्याजवळ दिसला होता. गुलाबी डॉल्फिन हा क्वचितच दिसणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत त्याचे दुर्मीळ रूप कॅमेऱ्यात कैद होणे ही प्राणीप्रेमींसाठी सुखद अनुभूती असते.

डॉल्फिनचे हे फोटो १८ जून रोजी @1800factsmatter नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आले होते. शेअर करताना युजरने लिहिले की, “उत्तर कॅरोलिनाच्या किनाऱ्यावर दुर्मीळ गुलाबी डॉल्फिन दिसला.” हे फोटो शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर आता गुलाबी डॉल्फिन चर्चेचा विषय बनला आहे.

वर्गात येताच विद्यार्थिनींनी केले असे काही की पाहून लाजली शिक्षिका, हाताने लपवला चेहरा अन्..; मजेशीर VIDEO व्हायरल

याआधीही कॅलिफोर्नियामध्ये व्हेल मासे पाहण्यासाठी गेलेल्या एका गटाला एक अद्भुत पांढरा डॉल्फिन दिसला होता. कॅस्पर नावाचा हा पांढरा डॉल्फिन व्हेल पाहण्यासाठी गेलेल्या लोकांच्या बोटीबरोबर पोहत होता. या फोटोंमध्येही डॉल्फिन समुद्रातील लाटांबरोबर मस्त उड्या मारताना दिसत आहे.

दुर्मीळ डॉल्फिनचे हे फोटो आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, गुलाबी डॉल्फिन पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या युजरने लिहिले, ही केवळ एडिटिंगची कमाल आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, जर गुलाबी डॉल्फिन खरोखरच अस्तित्वात असेल, तर ही अतिशय अवाक् करणारी गोष्ट आहे.