Viral Video: गरमागरम, कुरकुरीत, चटपटीत समोसा आणि त्याच्याबरोबर सॉस किंवा पुदिन्याची चटणी खाण्याची मजा काही वेगळीच असते. थंडी, पावसाळा असो किंवा छोटी पार्टी समोसा नसेल तर चुकल्यासारखे वाटते. रस्त्यावरच्या दुकानदारांपासून ते अगदी मोठ्या हॉटेलमध्ये पोहचलेला हा समोसा मेन्यू कार्डमधील अविभाज्य घटक झाला आहे.तर आज एका अमेरिकन शेफला (Chef) सुद्धा या भारतीय पदार्थाची भुरळ पडली आहे व त्याने अगदी भारतीय पद्धतीत हा समोसा बनवला आहे.
अमेरिकन शेफ यांच्या व्हिडीओवर काही युजरने “तुम्ही समोसा बनवला पाहिजे’ अशी कमेंट केली होती. तर ही कमेंट पाहून त्याने समोसा बनवण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओत तो सगळ्यात आधी युजरची कमेंट दाखवतो आणि मग समोसा बनवण्यास सुरुवात करतो. सगळ्यात आधी त्याने तीन बटाटे सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घेतले. त्यात मीठ घालून पाण्यात उकळवून घेतले. त्यानंतर तो समोस्याच्या आतमध्ये असणारी बटाट्याची भाजी तयार करून घेतो आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा व्हिडीओ.
हेही वाचा…प्रवासात लॅपटॉप घेऊन जाणे तरुणाला पडले महागात; रस्त्यावर आले वळण अन्… VIDEO पाहून उंचावतील भुवया
व्हिडीओ नक्की बघा…
त्यानंतर तेलात त्याने मसाल्यांचे मिश्रण तयार केले आणि हिरव्या मिरच्या, धणे आणि लसूण चिरले. मसाल्यांचे मिश्रण, हिरव्या मिरच्या, धणे, बारीक करून घेतलेल्या लसूण, स्मॅश करून घेतलेले उकडलेले बटाटे, मीठ, मटार, हळद घालून हे मिश्रण एकजीव करून घेतले. यानंतर मैदाच्या पिठात जिरे, तेल घातले आणि पीठ मळून घेतले. या मैदाच्या पिठाच्या गोळ्यांना पुरीसारखं लाटून त्याचे कोन करून घेतले आणि त्यात बटाट्याचे सारण भरले. त्यानंतर हे समोसे तेलात तळून घेतले आणि हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह केलं.
अमेरिकन शेफचे नाव न्यूटन असे आहे. त्याच्या इस्टाग्रामरील फॅनने समोसा बनवण्याचे सुचविल्यानंतर त्याने समोसा बनवतानाच हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.सोशल मीडियावर हा व्हिडीओ @milktpapi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. भारतीय पद्धतीत समोसा बनवलेला पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत आणि या अमेरिकन शेफची प्रशंसा करताना दिसून आले आहेत.