गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर रील्स आणि शॉर्ट व्हिडीओमध्ये हेच गाणं पाहायला मिळतंय. फक्त युजर्स नाही तर अनेक सेलिब्रिटींना सुद्धा या गाण्याने भुरळ घातली आहे. अनेक कलाकार या गाण्यावर रील्स तयार करून त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत आहेत. परंतु कच्चा बादाम गाण्याला टक्कर देण्यासाठी एक नवं गाणं आलंय. या गाण्याचे बोल आहेत ‘कच्चा अमरूद’. होय, कच्चा अमरूद नावाचं हे नवीन गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी काही काळापूर्वी गल्लीबोळात पेरू विकणारे काका कच्चा अमरूदच्या रिमिक्स म्युझिक व्हिडिओमध्ये  दिसत आहेत. हे काका सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ‘कच्चा बदाम’ नंतर आता ‘कच्चा अमरूद’ गाणं सोशल मीडियावर खूप ट्रेंड करत आहे. ‘कच्चा अमरुद’ हे गाणं १४ मार्च रोजी रिलीज झाले आहे. हे गाणं नेटकऱ्यांना आवडलं असून अनेक जण त्यावर रील्स बनवू लागले आहेत.

दरम्यान, कच्चा बादामनंतर कच्चा अमरुद नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून हे अमरुदवाले काका ट्रेंड व्हायरल झाले आहेत. या गाण्याला इन्स्टाग्रामवर १ लाख २० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After kaccha badam kaccha amrood trending on social media see viral video hrc