सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ आहे. कोणता व्हिडीओ नेटकरी उचलून धरतील याचा काही नेम नाही. काही व्हिडीओ इतक्या वेगाने व्हायरल होतात की, एखादी व्यक्ती स्टार बनून जाते. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर Kacha Badam हे गाणं व्हायरल होत आहे. या गाण्यामुळे शेंगदाणे विकणारा भुबन बड्याकर सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. आता त्याची ओळख एक गायक म्हणून समोर आली आहे. लोकं त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. त्याच्या कच्चा बादाम गाण्यावर देशातच नाही तर परदेशातही रील तयार केले जात आहे. या गाण्यावर सेलेब्रिटींनीही ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे.
कच्चा बादाम गाणं लोकं गुणगुणत असताना पेरू विकणाऱ्या एका व्यक्तीचं गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कच्चा बादामसारखंच हे गाणं वेगाने व्हायरल होत आहे. पेरू विकण्यासाठी ही व्यक्ती गाणं विकत असल्याचं दिसत आहे. गाण्यावरून येत्या काही दिवसात हे गाणं व्हायरल झालं तर आश्चर्य वाटायला नको.
पेरूवाल्याच्या गाण्याची तुलना आता नेटकरी कच्चा बादामशी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, चला आता या गाण्यावर रील बनवायला सुरुवात करूयात. दुसऱ्याने लिहिलं आहे की, आता हा रातोरात स्टार बनेल.