Ashutosh Rana Promoting BJP: लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी चालू असताना प्रत्येक पक्षाकडून स्टार प्रचारक नेमले जात आहेत. काही सेलिब्रिटी पक्षांच्या तिकिटावर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत तर काही पडद्याआड राहून प्रचार करत आहेत. अशातच लाइटहाऊस जर्नालिझमला अभिनेता आशुतोष राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळून आले, या व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपला मत देण्याचे आवाहन केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये ते एक कविता सादर करताना दिसत आहेत. तपासादरम्यान, आम्हाला या व्हिडीओची वेगळीच बाजू दिसून आली आहे.
काय होत आहे व्हायरल?
X युजर Heisenberhbec ने व्हायरल Video शेअर केला होता.
इतर वापरकर्ते देखील तीच पोस्ट शेअर करत आहेत.
तपास:
आशुतोष राणा यांची ही कविता सोशल मीडियावर शोधून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला आढळले की आज तकच्या फेसबुक पेजने ७ नोव्हेंबर २०२३ रोजी कविता शेअर केली होती.
मत देण्याचे आवाहन म्हणून आशुतोष राणा यांनी कविता कथन केल्याचे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. आशुतोष राणा यांनी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांच्या फेसबुक पेजवर ही कविता पोस्ट केली होती.
हे ही वाचा<< भाजप प्रदेशाध्यक्षांना जमावाकडून मारहाण, भररस्त्यातील ‘त्या’ हल्ल्याचा Video चर्चेत; घटनेचं मूळ वेगळंच!
हे देखील एका कॅप्शन सह शेअर केले होते: देशहित में वोट करे (देशाच्या हितासाठी मतदान करा)
निष्कर्ष: अभिनेते आशुतोष राणा यांनी राष्ट्रहितासाठी मतदान करण्याचे आवाहन कविता सादर केली होती, यामध्ये केवळ भाजपाला समर्थन देण्याचे सांगण्यात आलेले नाही.