उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आपण भारतीय एखाद्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही असे काही असेल तर तो म्हणजे आंबा. रसाळ, गोड आंबा खाण्याची कल्पना सुद्धा आपल्याला आनंदी करते. आंब्याचा हंगाम सुरू होताच, लोक या फळापासून चविष्ट पदार्थ बनवण्याचा आनंद घेतात. काही पारंपारिक पाककृतींना चिकटून राहतात, तर काही नवीन आणि रोमांचक पदार्थ तयार करण्यासाठी विचित्र खाद्य प्रयोग करतात. आंबा वापरून विचित्र फ्यूजन डिश तयार केले जात आहे. काही दिवसांपूर्वी मँगो पाणीपूरीची चर्चा सुरू होती. आता मँगो पिझ्झा नावाचा पदार्थ समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मँगो पिझ्झाचा व्हिडिओ पाहिला का?

BombayFoodDetails या इंस्टाग्राम पेजवर कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पिझ्झा बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे, जी पिझ्झा बेस तयार करण्यापासून सुरू होते आणि त्यानंतर सॉस लावला जातो, जो आंब्याच्या फोडींचा पासून तयार केला आहे. नंतर एक व्यक्ती पिझ्झावर बारीक कापलेल्या आंब्याचे तुकडे गोलाकार पॅटर्नमध्ये लावते आणि ब्रश वापरून गोड चटणीने सगळीकडे पसरवून लावते.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “स्वादिष्ट मँगो पिझ्झा खाऊन पहा.” @bombayfoodie_tales नुसार, हा पिझ्झा मुंबईच्या पवईच्या गॅलेरिया मॉलमध्ये ’99 पिझ्झा’ नावाच्या फूड जॉइंटवर विकला जातो.

हेही वाचा : वांग्यामध्ये बिया आहेत की नाही? न कापता कसं ओळखायचं, जाणून घ्या अगदी सोपी पद्धत

येथे व्हिडिओ पाहू शकता:

विचित्र फूड फ्युजनमुळे आंबा प्रेमींचा झाला संताप

शेअर केल्यापासून, व्हिडिओला २५ हजार पेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे ५ हजार पेक्षा जास्त लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे आणि अनेकांना यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. या विचित्र फ्यूजन डिशने पिझ्झा आणि आंबा प्रेमींना नाराज केले आहे, काहींनी कमेंटमध्ये विभागात त्यांचा असंतोष व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने लिहिले, “हा आंब्याचा अपमान आहे. पिझ्झा खायचा असेल तर योग्य पिझ्झा का खाऊ नये?”

हेही वाचा : उकाड्याने हैराण झालाय? मग शरीराला थंडवा देणारं बडीशेप सरबत प्या, जाणून घ्या सोपी रेसिपी

दुसर्‍या व्यक्तीने कमेंट केली, “बास. आधी आंबा पाणीपुरी, आता मँगो पिझ्झा. माझ्यासाठी अनफॉलो करण्यासाठी ही पुरेशी कारणे आहेत.”
तिसऱ्या व्यक्ती म्हणाला, “मला नापसंत बटण म्हणून वापरा.” “इटालियन आणि भारतीय दोघांनाही कसे दुखवायचे!” अशी प्रतिक्रिया दुसऱ्यांनी व्यक्त केली. पाचव्या व्यक्तीने लिहिले, “ये क्या बावसीर बना दिया हो?” (तुम्ही हे काय केलं आहे?) “मला इटालियन लोकांची यावर प्रतिक्रिया पहायची आहे. त्यांना खूप अनादर केल्यासारखे वाटेल” असेही एकाने म्हटले.

या मँगो पिझ्झा बद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही हा पदार्थ खाण्याचा प्रयत्न कराल का? आम्हाला नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After mango pani puri mango pizza this latest fusion dish has left foodies disappointed snk
Show comments