Banana Pizza Viral Video: सोशल मीडियावर आपण असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील तर ज्यात स्ट्रीड फूड विक्रेते काही विचित्र खाद्यपदार्थ तयार करतात. असे व्हिडिओ पाहून लोक त्याबद्दल राग व्यक्त करत असतात. आतापर्यंत आपण सोशल मिडियावर लोकांनी चॉकलेट मॅगी, मँगो पाणीपुरी किंवा मँगो पिझ्झा सारखे अनेक पदार्थ पाहिले असतील. दरम्यान असाच एक विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडिओ पुन्हा सोशल मिडियावर व्हायरल होत आहे यावेळी हा पदार्थ आहे ‘बनाना पिझ्झा’. हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर होत आहे.

सहसा अनेक लोकांना पिझ्झा खायला आवडतो. मोठ-मोठ्या हॉटेलमध्ये किंवा रस्त्यावर छोट्या विक्रेत्यांकडे मिळणारा पिझ्झा खाण्यासाठी लोक लांबून येतात. पिझ्झा तयार करण्यासाठी सहसा मैद्याचा जाडसर बेस वापरला जातो त्यावर पनीरसह वेगवेगळ्या भाज्यांचे टॉपिग्ज केले जाते. तसेच व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक कंन्टेट क्रिएटर पिझ्झा तयार करत आहे जे पाहून लोकांना प्रचंड राग येत आहे.

How To Manage Cold Naturally Without Medication Home Remedy For Cold And Cough
हवा बदल झाल्याने सर्दी-कफाने बेजार? पाच सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम, वाटेल फ्रेश
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Paani Movie on the Water Crisis
Paani Movie Review : पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा
a tea seller from gujarat sings amazing song
गुजरातच्या चहावाल्याचं टॅलेंट एकदा पाहाच! चहापेक्षा कडक गातोय भाऊ; VIDEO होतोय व्हायरल
Health Benefits of Daily Hugs
तुम्ही दररोज किती वेळा मिठी मारता? जाणून घ्या, मिठी मारणे हे आरोग्यासाठी कसे फायदेशीर?
Borderline Personality Disorder BPD among youth
स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
marburg virus
जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा – मॅकडॉनल्डच्या खाद्यपदार्थामुळे ४ वर्षीय मुलीला चटका बसल्याचा पालकांचा दावा, मागितली ‘एवढी’ नुकसानभरपाई

केळ वापरून केला पिझ्झा
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरामध्ये एक भांड्यात दोन केळाचे साल काढतो. ज्यानतंर ते दाबून त्याची पेस्ट करतो आणि गॅसवर ते शिजविण्यासाठी ठेवतो. शिजल्यानंतर त्यात भरपूर पिझ्झा सॉस टाकतो आणि वरुन खूप सारे चीज टाकचो. नंतर ते मायक्रोव्हेमध्ये टाकून बेक करुन बाहेर काढत आहे. बनाना पिझ्झा अगदी सामान्य पिझ्झासारखा दिसत आहे. जो व्यक्ती एक चाकू ने कापून त्याचा रोल करताना दिसत आहे. पण सध्या हा व्हिडिओ पाहून असे दिसते की हा पिझ्झा खाण्यापेक्षा प्रयोग म्हणून तयार केला आहे.

हेही वाचा – स्ट्रीट फूड विक्रेत्याने बनवलेला खतरनाक पराठा पाहून घाबरले लोक! म्हणाले,”फाशी ऐवजी हा पराठा खायला द्या”

पिझ्झा पाहून संतापले लोक
हा व्हिडिओ @yourdailydoseofkringe या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओला ५ हजारपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शविले आहे आणि जवळापास २ लाख ८० हजारपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे. व्हिडिओ पाहून काही लोकांनी राग व्यक्त केला आहे. एकाने लिहिले की ”हे पाहून इटलीमधील लोक जीव देतील”. तर दुसऱ्याने लिहिले की, ”इटलीचे लोक या व्यक्तीला अटक करु इच्छित आहे.”