EVM Caught in Van Viral Video: लाईटहाऊस जर्नालिझमला एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. मोदींनी उमेदवारी अर्ज भरताच वाराणसीत भाजपने ईव्हीएममध्ये हेराफेरी केल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात येत आहे. हा व्हिडीओ अलीकडील असल्याचे देखील सोशल मीडिया युजर्स सांगत आहेत. सध्या देशात चालू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी याचा काही संबंध आहे का व असल्यास याबाबत काही कारवाई केली जाणार का हे सांगणारा हा तपास नक्की वाचा.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @brishty_1 ने व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Sanjay Shirsat On Mahayuti Election Seats
Sanjay Shirsat : “भाजपा मोठा पक्ष, त्यांना तडजोड…”, विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
jammu and kashmir polls 2024 bjp likely to get major seats in jammu
Jammu And Kashmir Assembly Polls: …तरीही जम्मूमध्ये मते भाजपलाच!
J&K Assembly Election 2024
J&K Assembly Election 2024 : “पीडीपी आणि एनसीने आधी दहशतवादी असलेल्या लोकांचा प्रचारासाठी..”, भाजपाच्या बड्या नेत्याचा गंभीर आरोप
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
RSS in Uttar pradesh
RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
https://x.com/brishty_1/status/1790579246127366204

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडीओ शेअर करत आहेत.

https://x.com/Jagdishbhatti3/status/1790234502062809597
https://x.com/VD18231409/status/1790414539647078544
https://x.com/raajvnv/status/1790435947605041438
https://x.com/mohd_uved/status/1790560167353843813

तपास:

व्हिडीओचे बारकाईने निरीक्षण करून आम्ही तपास सुरू केला. हा व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती ‘पहारिया मंडीत’ ईव्हीएम सापडल्याचे म्हणत होता. त्यानंतर आम्ही ‘पहारिया मंडी’ हा शब्द शोधला आणि ते ठिकाण वाराणसीमध्ये असल्याचे आढळले. त्यानंतर आम्ही YouTube वर “EVM, वाराणसी” हे शब्द शोधले आणि त्यावरून आम्हाला एडिटोरीजी च्या YouTube चॅनेलवर शेअर केलेला व्हिडीओ सापडला.

व्हिडीओ २०२२ मधला असल्याचे डिस्क्रिप्शन मध्ये सांगण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी सत्ताधारी भाजपावर मते चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी दावा केला की वाराणसीमध्ये ईव्हीएम घेऊन जाणारा ट्रक “इंटरसेप्ट” करण्यात आला आणि ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे.

या व्हिडीओ मधील दृश्य व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ सारखेच होते.

आम्हाला त्याच संदर्भात काही बातम्या देखील आढळल्या.

https://theprint.in/politics/after-akhilesh-yadavs-evms-tampering-allegations-sp-workers-stage-protest-outside-evm-strong-room-in-varanasi/864449/
https://www.jagran.com/uttar-pradesh/varanasi-city-while-carrying-evms-in-vehicle-from-counting-site-pahariya-mandi-samajwadi-party-worker-caught-uproar-in-varanasi-22528115.html
https://www.livehindustan.com/uttar-pradesh/varanasi/story-two-more-arrested-in-pahariya-mandi-evm-case-6379912.html

त्यावर एएनआयने दिलेले वृत्तही आम्हाला सापडले.

https://www.aninews.in/news/national/general-news/after-akhilesh-yadavs-allegation-of-evms-tampering-varanasi-dm-holds-meeting-with-representatives-of-parties20220308223125/

वृत्तात म्हटले आहे: माध्यमांशी बोलताना शर्मा म्हणाले, “सुमारे 20 ईव्हीएम यूपी कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी नेले जात होते. काही राजकीय कार्यकर्त्यांनी हे वाहन थांबवले आणि हे ईव्हीएम निवडणुकीत वापरले गेल्याचे सांगून अफवा पसरवली. पकडले गेलेले हे ईव्हीएम मशीन वेगळे आहे उद्या मतमोजणीच्या ड्युटीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण आहे आणि या मशीन्स नेहमी प्रशिक्षणासाठी वापरल्या जातात.” ते म्हणाले की, वर नमूद केलेल्या 20 ईव्हीएमचा वापर मतदानात झाला नाही, तर हे प्रशिक्षणासाठी पाठवलेले ईव्हीएम आहेत.

आम्हाला सीईओ यूपीच्या एक्स हँडलवर याबद्दल एक प्रेस नोट देखील सापडली.

https://x.com/ceoup/status/1501260691180687361

निवडणूक निकालापूर्वी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी नलिनी कांत यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना निवडणूक ड्युटीवरून काढून टाकण्यात असल्याचे आम्हाला वृत्तात नमूद केल्याचे दिसून आले.

https://www.hindustantimes.com/india-news/ahead-of-up-election-result-3-officers-removed-from-poll-duty-amid-evm-row-101646850762269.html

बातम्यांनुसार या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनांची वाहतूक कडेकोट बंदोबस्तात केली जाणार आहे. सर्व वाहने जीपीएसने सुसज्ज असतील असेही सांगण्यात आले आहे.

https://www.hindustantimes.com/cities/others/evm-shifting-to-be-tracked-tight-vigil-at-storage-centres-varanasi-dm-101714412404462.html

हे ही वाचा<< ओवेसींच्या मतदारसंघात मतदाराला बाजूला करून EVM चं बटण दाबायला भलताच एजंट? Video ची दुसरी बाजू पाहिलीत का?

निष्कर्ष: वाराणसी, उत्तर प्रदेशमधील EVM गोंधळाचा जुना व्हिडीओ आता भाजपने EVM घोटाळा केल्याचे सांगून अलीकडील असल्याचे म्हणत शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.