Viral Video : आशिया कप २०२३ मध्ये अनेक संकटांवर मात करून अखेर काल भारताने पाकिस्तानला हरवून दणदणीत विजय मिळवला आहे. भारतानं काल ११ सप्टेंबर रोजी २२८ धावांच्या फरकानं हा सामना जिंकला आहे. भारतानं पाकिस्तानला ३५७ धावांचं आव्हान दिलं होतं; पण पाकिस्तान ८ विकेट गमावून १२९ धावाच करू शकला आणि त्यामुळे भारतानं या सामन्यात पाकिस्तानवर मोठ्या फरकानं मात केली.
या सामन्यात भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून सोशल मीडियावर विविध माध्यमांतून त्यांचं कौतुक केलं जात आहे. काही जण मिम्स तयार करीत आहेत; तर काही जण खास फोटो पोस्ट करून खेळाडूंच्या कामगिरीला दाद देताना दिसून येत आहेत. तर यादरम्यान एका पाकिस्तानी व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्हीसुद्धा पोट धरून हसाल.
पाकिस्तानच्या पराभवानंतर एक यूट्युबर व्हिडीओत पाकिस्तानी व्यक्तीची प्रतिक्रिया जाणून घेत आहे. भारतानं ज्या पद्धतीनं सामना खेळून पाकिस्तानला हरवलं ते बघून अज्ञात व्यक्ती अगदीच भावूक होते आणि मजेशीर उत्तर देते आणि म्हणते की, असं कोणी मॅच खेळतं का? “नशीब पाऊस पडला. जर पाऊस पडला नसता, तर इंडियानं ५०० रन नक्कीच केले असते”, असं अज्ञात पाकिस्तानी व्यक्ती भावूक होऊन बोलताना आणि रडतानासुद्धा दिसून येत आहे; जे पाहून प्रश्न विचारणाऱ्या यूट्युबरलासुद्धा हसू येत आहे. मजेशीर प्रतिक्रिया देणाऱ्या पाकिस्तानी चाहत्याचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा
भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर पाकिस्तानचा चाहता ढसाढसा रडला…
पाकिस्तान विरुद्ध भारत या कालच्या सामन्यात कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. तसेच भारताचा खेळाडू हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमची सगळ्यात महत्त्वाची विकेट घेतली. तर, विराट कोहलीनं १२२ आणि के. एल. राहुलनं १११ धावा; तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या अनोख्या पार्टनरशिपने या सामन्याचा धावफलक ३५६ धावांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम कामगिरी बजावली. तसेच खेळाडूंची सामन्यातील कामगिरी पाहून पाकिस्तानी व्यक्तीने व्हिडीओत आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त केल्या आहेत आणि व्हिडीओच्या सुरुवातीला पावसाचे आभार मानले आहेत. “जर पाऊस पडला नसता, तर भारतानं ५०० रन कन्फर्म केले असते”, असं मतं मांडताना तो दिसून आला आहे; जे पाहून तुम्हालासुद्धा हसू आवरणार नाही.
व्हायरल झालेला व्हिडीओ केवळ ११ सेकंदांचा आहे. पण पाकिस्तानी व्यक्तीनं ज्या प्रकारे आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत, ते पाहून तुम्हाला हसू येईल. तसेच हा व्हिडीओ @BingBhai या युजरच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करून लिहिलेय, “एका पाकिस्तानी चाहत्याची मजेशीर प्रतिक्रिया ऐका; ज्याला कालचा सामना बघून वाईट वाटलं आहे”, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसेच या व्हिडीओवर भारतीय अनेक मजेशीर कमेंट करताना दिसून आले आहेत आणि सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.