एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएल ही स्पर्धा खेळवली जात असल्याच्या मुद्द्यावरुन आता हळूहळू सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. आयपीएलच्या आयोजनासंदर्भात प्रश्न चिन्ह निर्माण होत असतानाच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या सोडवण्यासाठी ५० हजार डॉलर म्हणजेच ३७ लाख ३६ हजार रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिले आहेत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियन संघातील जलद गती गोलंदाज पॅट कमिन्सने ही मदत केली आहे. मात्र कमिन्सने केलेली मदत घेताना मोदी सरकारला करोना ही देशांतर्गत बाब असल्याचं आठवलं नाही का असा प्रश्न नेटवर अनेकांनी उपस्थित केला आहे.
शेतकरी आंदोलनाच्यावेळी अमेरिकन पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटनंतर अनेक सेलिब्रिटींनी तसेच भारत सरकारने शेतकरी आंदोलन हा देशाची अंतर्गत बाब असल्याचं म्हणत परदेशी सेलिब्रिटींनी यासंदर्भात संपूर्ण माहिती घेऊन बोलावं अशी भूमिका स्पष्ट केली होती. आता करोना कालावधीमध्ये एका परदेशी खेळाडूनेच केलेल्या मदतीवरुन नेटकऱ्यांनी मोदी सरकारच्या याच जुन्या भूमिकेची आठवण त्यांना करुन दिलीय.
जिंकलंस भावा… ऑक्सिजन पुरवठ्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूने PM Cares निधीला दिले ३७ लाख रुपयेhttps://t.co/wUxEzEuZ73
हा खेळाडू यंदा आयपीएलमध्ये कोलकात्याच्या संघाकडून खेळतोय#PatCummins #Corona #Covid19 #PMCaresFund #IPL2021 #OxygenShortage #Oxygen— LoksattaLive (@LoksattaLive) April 26, 2021
कमिन्सने यासंदर्भात एक मोठा मेसेज लिहिला असून त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे. तसेच लोकांनी आपल्या भावानांना योग्यपद्धतीने वापरु त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्स म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
नेटकऱ्यांनी कमिन्सने केलेली मदत स्वीकारण्यावरुन मोदी सरकारला अंतर्गत बाब म्हणजेच इंटरनल मॅटरची आठवण करुन दिलीय. भारतीय खेळाडूंकडून दान तर लांब राहिलं किमान या करोनाच्या ‘इंटरनल मॅटर’वर बोलतील तरी अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केलीय. कोण काय म्हणालं आहे पाहुयात.
१) भारतीय क्रिकेटपटूंना आठवण करुन द्यायची आहे
Hello, Indian Cricketers
Now it’s time to teach Pat Cummins that this is India’s internal matter. pic.twitter.com/mabIpV8dUN
— Anahat(@UntoldStorY06) April 26, 2021
२) त्याने दान केलेत पैसे सरकारसमर्थकांनी त्याला काहीतरी बोला
Waiting for pro govt nationalists to slam Pat Cummins for his donation towards our internal matter and tell him that we will find amicable solution. #ModiFailsIndia https://t.co/APjuFWJen2
— Tulsidas Khan (@SecularASFK) April 26, 2021
३) आमच्या अंतर्गत बाबीत पडतोय तो
Is it interference in the internal matter of India?
salute Pat Cummins pic.twitter.com/sHwP1mMitZ— Ashish Gupta (@AshishOsb) April 26, 2021
४) का पडला तो अंतर्गत बाबीत
Pat Cummins interfering in our internal matter.
— Alagappan Vijayakumar (@IndianMourinho) April 26, 2021
५) भारतीय किमान बोलतील तरी…
Thanks @patcummins30 for this wonderful gesture.
Hope all our Indian players too if not contribute atleast ‘speak up’ on this ‘internal matter’ https://t.co/pXfqvmXNJa
— Purva Chitnis (@ChitnisPurva) April 26, 2021
६) त्याला लाज वाटली पाहिजे
Pat Cummins interfered in our Internal Matter
Shame on him
He is trying to defame India#BoycottKKR#ToolkitExposed— Jumbozz(@Solskjaer69420) April 26, 2021
७) तुरुंगात टाका
Pat Cummins need to be jailed for interfering in our internal matter https://t.co/NJO06pnHr3 pic.twitter.com/JaMLwhCDZn
— I’m@Nuts(@crazycreature55) April 26, 2021
कमिन्सने केलेल्या या या ट्विटनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर त्याचं ट्विट व्हायरल झालं असून ३८ हजार जणांनी ते रिट्विट केलं आहे. एक लाखांहून अधिक जणांनी ते लाईक केलं असून हजारो लोकांनी त्यावर कमेंट करत कमिन्सने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत. अनेकांनी कमिन्सकडून इतर खेळाडूंनी प्रेरणा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.