सध्या सोशल मीडियावर एकच नाव चर्चत आहे ते म्हणजे रिंकू सिंग. ते चर्चेत असण्याच कारण म्हणजे, कोलकाता नाईट रायडर्सने रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी २९ धावांची गरज असतानाच रिंकू सिंगने शेवटच्या षटकात पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

केकेआरच्या विजयाचे सेलिब्रेशन करताना सर्व खेळाडूंनी आणि चाहत्यांनी रिंकूचे तोंडभरुन कौतुक केले. तर रिंकूने पाच षटकार मारताच संपुर्ण स्टेडियम आणि सोशल मीडिया रिंकूमय झाले होते. अनेकांनी त्याच्या या खेळीच जोरदार कौतुक केलं. तर केकेआरच्या फॅन्ससाठी तर रिंकू हिरोच ठरला. शिवाय रिंकूच्या या अप्रतिम खेळीची बॉलिवूड अभिनेते शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही फॅन झाली, तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रिंकू सिंगचा फोटो शेअर केला.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
Sunil Gavaskar Statement on India Defeat
IND vs AUS: “हॉटेलच्या रूममध्ये बसून…”, सुनील गावस्कर पराभवानंतर भारतीय संघावर संतापले, रागाच्या भरात नेमकं काय म्हणाले?
Order to seize Ajit Pawar property cancelled Mumbai news
शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द
when Amol Palekar slapped Smita Patil without her consent
“मी तिला झापड मारली”, अमोल पालेकरांनी सांगितला स्मिता पाटील यांना न सांगता केलेल्या सीनचा प्रसंग; म्हणाले “ती संतापली होती”
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?

पण या सर्व प्रकरणात मात्र, केकेआरचा एक स्टाफ मेंबर चांगलाच ट्रोल झाला. कारण रिंकूची खेळी सर्वांसाठी आनंदाची बाब असताना केकेआरचा एक सदस्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंदाची प्रतिक्रिया नसल्याचं नेटकऱ्यांकडून म्हटलं जात होतं. इंटरनेटवर या कर्मचाऱ्याला जोरदार ट्रोल केल्यानंतर या कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ कोलकाता नाइट रायडर्सचे माजी संघ संचालक जॉय भट्टाचार्य मैदानात उतरले आहेत. हो कारण त्यांनी या ट्रोल केल्या जाणाऱ्या व्यक्तीबाबतची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

“ही व्यक्ती आहे केकेआरचे विश्लेषक एआर श्रीकांत आहेत, जे १५ वर्षांपासून संघासोबत आहे. २००९ मध्ये केकेआरने सलग ७ सामने गमावले होते, त्यानंतर श्रीकांने केकेआरचा टॅटू बनवला होता. त्याच्यापेक्षा केकेआरची जास्त काळजी घेणारा दुसरा कोणी व्यक्ती मला माहिती नाही.” त्यामुळे नेटकरी ज्या व्यक्तीला ट्रोल करत आहेत तो व्यक्ती केकेआरचा शुभचिंतकच असल्याचं भट्टाचार्य यांनी सांगितलं आहे. शिवाय कोणाच्याही चेहऱ्यावरील हावभावावरुन कसलेही तर्क लावू जाऊ नयेत असंही भट्टाचार्य यांनी नेटकऱ्यांना सुनावलं.

Story img Loader