देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात. यातील काही व्हिडीओ भावनिक, मजेशीर तर काही अवाक् करणारे असतात. आनंद महिंद्रा अशा पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात एक व्यक्ती सर्वात मोठा पराठा बनवताना दिसत आहे. हा पराठा इतका मोठा आहे की, जो पाहून खुद्द आनंद महिंद्राही अवाक् झाले आहेत. याशिवाय युजर्सही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खूप मोठा पराठा बनवताना दिसत आहे. हा पराठ्याचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, हे पाहिल्यानंतर कोणाला पिझ्झा खाण्याचं मन करेल? सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विविध कमेंट्स करत आहेत.

Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
a groom said amazing ukhana for bride
“मेथीची भाजी आहे स्वस्त…” नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती खूप मोठा पराठा बनवताना दिसत आहे. हा पराठा इतका मोठा आहे की, सात ते आठ लोक सहज खाऊ शकतील असे वाटते… या पराठ्याचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

‘अगदी सत्य’ अभिषेक बच्चननेही केली कमेंट

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला सात लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे, हा खूप छान व्हिडीओ आहे. पराठा हेल्दी असण्यासोबतच खूप चविष्टदेखील आहे. या व्हिडीओवर कमेंट करण्यास फिल्मस्टार अभिषेक बच्चनही स्वत:ला रोखू शकला नाही. त्याने कमेंट करत लिहिले की, तुम्ही अगदी सत्य सांगत आहात.

Story img Loader