आई आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करते. ती मुलांसाठी काहीही करू शकते. सोशल मीडियावर आईशी संबंधित अशा अनेक घटना व्हायरल होत असतात. ज्यामध्ये ती मुलांसाठी कष्टाची काम करताना दिसते. अनेकदा तर आईने मुलांसाठी केलेला त्याग पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं. अशा अनेक गोष्टी आईबद्दल सांगता येतील ज्या आपल्या हृदयाला भिडतात. त्याचं कारण म्हणजे आईच्या प्रेमाला मर्यादा नसते. ती आपल्या मुलांच्या सुखासाठी काहीही करु शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आईबद्दल तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही, कारण सर्वांनाच आईच्या मातृत्वाची आणि तिच्या निस्वार्थ प्रेमाची कल्पना आहे. सध्या अशाच एका आईची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. व्हायरल फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा आई किती निस्वार्थी प्रेम करु शकते याची जाणीव होईल यात शंका नाही.

हेही पाहा- ‘मला बाई दारूड्या भेटलाय नवरा…’ गाण्यावर चिमुकल्याच्या भन्नाट डान्स, चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

सध्या एका तरुणाने आईशी केलेल्या चॅटींगचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या आईचा एक सुंदर निरोप आला आहे जो वाचून नेटकरी, ‘आई ही आईच असते, तिच्या प्रेमाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही’ असं म्हणत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो ऋषिक सूरी नावाच्या युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

हेही पाहा- आयुष्यभर कष्ट केलं अन् म्हातारपणी पालटलं नशीब; रिक्षा चालक रात्रीत बनला करोडपती

ज्यामध्ये तो मीटिंगमध्ये असताना त्याच्या आईने “आय लव्ह यू” असा मेसेज केल्याचं पाहायला मिळत आहे. या दोघांच्या चॅटवरुन आईने फोन केला असता त्याने आपल्या आईला मिटींगमध्ये बिझी असल्याचं सांगितल्याचं दिसत आहे. ‘शिवाय काही अर्जंट हे का?’ असं मुलाने विचारलं असता आईने दिलेला रिप्लाई खूप मजेदार आणि भावूक करणारा आहे. मुलाच्या मेसेजवर आई म्हणते, “समजलं, पण मला फक्त तुला ‘आय लव्ह यू’ म्हणायचं होतं.”

हा फोटो बघून अनेकांनी आई अशीच असते, असं म्हटलं आहे. तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये “माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे.” असं ऋषिक याने लिहिलं आहे. हा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकजण त्यावर प्रेमळ प्रतिक्रिया देत आहे. एका वापरकर्त्याने लिहिलं, “त्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.” दुसर्‍या एकाने “आईसारखं प्रेम कोणीही करु शकत नाही” असं लिहिलं आहे. तर आणखी एकाने ‘हीच आईची माया’ अशी कमेंट केली आहे. त्यामुळे हा व्हायरल फोटो पाहून अनेक नेटकरी भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे.