रस्त्यावर झालेल्या विचित्र अपघातांची वेगवेगळी कारणे आतापर्यंत तुम्ही ऐकली आणि वाचली असतील. मात्र अमेरिकेमध्ये चक्क पॉर्नमुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण खरोखरच असा प्रकार समोर आला आहे. येथील मिशिगनमधील एका रस्त्यावर लावण्यात आलेल्या डिजीटल होर्डिंगवर चक्क पॉर्न व्हिडिओ प्ले करण्यात आला. त्यामुळे चालकांचे रस्त्यावरील लक्ष विचलीत झाले. अनेक चालकांनी पोलिसांना फोन करुन या होर्डिंगसंदर्भात तक्रार केल्यानंतर हा व्हिडिओ हटवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार मिशिगनमधील औबर्न हिल्स परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या होर्डिंगवर चक्क लेस्बियन पॉर्न व्हिडिओ लावण्यात आला होता. या होर्डिंगवरील व्हिडिओची तक्रार करणारे अनेक फोन पोलिसांना आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. आय ७५ आणि एम ५९ परिसरामधील होर्डिंगवर आक्षेपार्ह व्हिडिओ लावण्यात आल्याचे अनेकांनी पोलिसांना फोन करुन सांगितले.

या रस्त्यावरुन जाणाऱ्या जस्टीन कामो या ट्रक चालकाने या भागातून जाताना रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या होर्डिंगवर पॉर्न व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटल्याचे सांगितले. ‘मी ट्रक चालवत असतानाच अचानक होर्डिंगवर मला पॉर्न व्हिडिओ सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे माझे लक्ष विचलित झाले. तो लेस्बियन पॉर्न व्हिडिओ होता,’ अशी माहिती कामो यांनी पोलिसांना दिली. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारामध्ये एखाद्या मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवल्याप्रमाणे हा व्हिडिओ चालकांना दिसत असल्याने ते विचलित होत आहेत.

याचसंदर्भात बोलताना चक मॅकहॉन याने आधी मला हा व्हिडिओ एखादी जाहिरात असल्याचे वाटलं होतं पण तो एक पॉर्न व्हिडिओ असल्याचे नंतर माझ्या लक्षात आले. हा व्हिडिओ या होर्डिंगवर तब्बल २० ते २५ मिनिटांसाठी दिसत होता. या व्हिडिओमुळे चालकांचे लक्ष विचिलित झाले तरी मोठा अपघात झाला नाही असं पोलिसांनी सांगितले. या सर्व प्रकारासाठी दोषी कोण आहे याचा पोलीस तपास करत असले तरी प्राथमिक अंदाजानुसार हे हॅकर्सचे काम असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Story img Loader