पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी धबधबे किंवा धरण अशा ठिकाणांना लोक भेट देतात. पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना आणखी ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला. सोशल मीडियावर या दोन्ही घटनाचं थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले दरवर्षी अशा घटना घडतात तरीही लोक आपला जीव धोक्यात टाकतात. धबधब्या सारख्या ठिकाणी भेट देताना खूप सावगिरी बाळगावी लागते अन्यथा होत्याचे नव्हते होण्यासाठी फार वेळ लागत नाही. लोणावळ्यात पाण्यात भिजणाऱ्यांना कुटुंबाने कल्पनाही केले नसेल की ज्या पाण्यात खेळत आहेत ते पुढील काही वेळात त्यांचा जीव घेऊ शकतं. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि लोंकाच्या डोळ्यादेखतं हे लोक वाहून गेले. अजनातेपणी, वेळीच धोका न कळल्याने एखाद्यावर काय संकट येऊ शकते हेच या घटना दर्शवत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एका मिनिटांमध्ये धबधब्याचे पाणी कसे वाढते हे पाहायला मिळते.

इंस्टाग्रामवर being_baramatikar नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला याची माहिती दिली नाही. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मिनिटांत धबधब्याचे पाणी कसे वाढते बघा. व्हिडिओ आपल्याकडील नसेल तरी धबधब्याची परिस्थिती सारखीच असते. सावध रहा ! अवास्तव धमक नको.”

One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
Shocking video Komodo Dragon Eat Goat In Just 5 Seconds Animal Video Viral
“या” महाकाय प्राण्यानं ५ सेकंदात गिळली जिवंत बकरी; पोटातून येतोय रडतानाचा आवाज, VIDEO पाहून काळजाचं पाणी होईल
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

हेही वाचा – ‘तो वाहून गेला अन् लोक बघत राहिले’, पुण्यातील तरुणाने धबधब्यात मारली उडी, थरारक घटनेचा Video Viral

व्हिडीओमध्ये काय दिसते?

व्हायरल व्हिडीओ एका धबधब्याचा आहे जथे सुरुवातीला खडकाळ भागातून पाणी वाहताना दिसते होते. पाण्याचा प्रवाग अगदी मी आहे. हे धबधब्याचे पाणी मागून एका उंच डोगलावरून कोसळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान पुढच्याक्षणी मागील डोगरावरून वाहणारे पाणी वाढते आणि पुढच्या काही सेकांदामध्ये धबधब्याचे आक्राळ विक्राळ स्वरुप पाहायला मिळते. वाट मिळेल तेथून पाण्याचा जोरदार प्रवाह वाहू लागतो. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो धबधब्यासारख्या ठिकाणी अशा घटना घडण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे अशा ठिकाणी भेट देताना सतर्क राहणे, जास्त पाण्यामध्ये न जाणे सुरक्षित असते. अन्यथा कधी पाण्याचा जोर वाढेल आणि कधी पाण्याच्या प्रवाहाबरोबर आपण वाहून जाऊ हे लोकांना कळणार देखील नाही.

हेही वाचा – “मोत्यापेक्षा सुंदर अक्षर!”, दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीचं हस्ताक्षर ठरतोय चर्चेचा विषय, Viral Video एकदा बघाच

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एकाने लिहिले की, “विज्ञान आजपर्यंत पाण्याचा वेग अडवू शकले नाही तर माणूस कोण आहे निसर्गासमोर…” दुसरा म्हणाला, “तरीही काही लोक साहसच्या नावाखाली मुर्खपणा करायला जातात आणि धोका पत्करतात” तिसरा म्हणाला, “गावातल्या लोकांना माहीत आहे परंतु शहरातल्या लोकांना याची कल्पना नाही तरी सर्वांनी काळजी घ्यावी. फोटो आणि व्हिडिओ साठी आपले जीव धोक्यात टाकू नये”

Story img Loader