पावसाळ्यात वर्षाविहार करण्यासाठी धबधबे किंवा धरण अशा ठिकाणांना लोक भेट देतात. पण अशा ठिकाणी भेट देताना अनेकदा लोक आपल्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करतात आणि स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. लोणावळ्यात भुशी डॅममध्ये एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असताना आणखी ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली येथे एका तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि जोरदार पाण्यामध्ये तो वाहून गेला. सोशल मीडियावर या दोन्ही घटनाचं थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आले दरवर्षी अशा घटना घडतात तरीही लोक आपला जीव धोक्यात टाकतात. धबधब्या सारख्या ठिकाणी भेट देताना खूप सावगिरी बाळगावी लागते अन्यथा होत्याचे नव्हते होण्यासाठी फार वेळ लागत नाही. लोणावळ्यात पाण्यात भिजणाऱ्यांना कुटुंबाने कल्पनाही केले नसेल की ज्या पाण्यात खेळत आहेत ते पुढील काही वेळात त्यांचा जीव घेऊ शकतं. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि लोंकाच्या डोळ्यादेखतं हे लोक वाहून गेले. अजनातेपणी, वेळीच धोका न कळल्याने एखाद्यावर काय संकट येऊ शकते हेच या घटना दर्शवत आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीडीओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये एका मिनिटांमध्ये धबधब्याचे पाणी कसे वाढते हे पाहायला मिळते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा