आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रेमी काय करतील, याचा काही नेम नाही. नशिबाने काहींचे प्रेम यशस्वी होते, तर काहींचे प्रेम अयशस्वी ठरते. काही लोक जुन्या आठवणी विसरून नवीन आयुष्य जगतात, तर काही लोकांना ते सहन होत नाही. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, प्रियकर प्रेमात अयशस्वी झाला. त्याच्या मैत्रिणीने त्याच्याशी संबंध तोडले. अशा स्थितीत प्रियकराने प्रेयसीवर सूड उगवला. त्याने आपल्या मैत्रिणीचे अपहरण केले आणि तिच्या चेहऱ्यावर आपले नाव गोंदवले.

बातमीनुसार, हे प्रकरण ब्राझीलच्या साओ पाउलो येथील आहे. कोएल्हो नावाच्या २० वर्षांच्या मुलाचे तायाने काल्डास नावाच्या १८ वर्षांच्या मुलीवर प्रेम होते. भांडणानंतर दोघांचे ब्रेकअप झाले. कोलेहोला हे सहन झाले नाही आणि त्याने शाळेत जाणार्‍या तायनेचे अपहरण केले. यानंतर त्याने तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला टॅटूने त्याचे पूर्ण नाव लिहिले.

Viral: प्रियकराला भेटण्यासाठी पोहत केले सीमोल्लंघन! बघा खऱ्या आयुष्यातील ‘अजब प्रेम की गजब कहाणी!’

मुलगी घरी नसल्याचे आईला वाटल्याने तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मुलगी तिच्या माजी प्रियकराच्या घरी होती. तरुणीच्या तक्रारीवरून कोएल्होला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, मुलाच्या वडिलांनी सांगितले की, मुलीने स्वतःच्या इच्छेने टॅटू बनवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोएल्हो हा टॅटू आर्टिस्ट आहे. त्याने आपल्या मैत्रिणीच्या शरीराच्या अनेक भागांवर टॅटू बनवले आहेत. अशा परिस्थितीत पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Story img Loader