ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल प्रासादात निधन झाले. त्या ९६ वर्षाच्या होत्या. राणी एलिझाबेथ यांनी ७हून अधिक दशके ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटिश वसाहतींचे राष्ट्रप्रमुखपद सांभाळले. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला असून ब्रिटनमधील बहुतेकांना राणी एलिझाबेथ यांच्याव्यतिरिक्त राजसिंहासनावर इतर कोणीही व्यक्ती ज्ञात नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र त्यांच्या निधनानंतर जवळपास ६०० ब्रँड्सच्या चिंतेत भर पडली आहे. या कंपन्यांना रॉयल वॉरंट म्हणजेच शाही मोहर हातातून निसटणार असल्याची भीती सतावते आहे. कारण आता त्यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे उत्तराधिकारी आणि ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये फोर्टनम आणि मेसन टी, बर्बेरी रेनकोट, कॅडबरी चॉकलेट, ब्रूमस्टिक आणि डॉग फूड यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

एकूण ६०० कंपन्यांना रॉयल मोहर मिळाले आहे आणि जर ब्रिटनच्या नवीन राजाने याला मान्यता दिली नाही, तर त्या मोहरचा वापर करण्यासाठी कंपन्यांकडे फक्त दोन वर्षे शिल्लक राहतील. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भूमिकेत किंग चार्ल्स यांनी स्वतःसाठी १५० हून अधिक ब्रँड्सना रॉयल वॉरंट जारी केले होते.

काहीच न बोलता टिकटॉकर Khaby Lame एका पोस्टमागे कमावतो ‘इतके’ रुपये; विराट कोहलीची कमाईही थक्क करणारी

रॉयल वॉरंट म्हणजे काय?

रॉयल वॉरंट होल्डर्स असोसिएशनने सांगितले की रॉयल वॉरंट धारकांना त्यांची उत्पादने, पॅकेजिंग, स्टेशनरी, जाहिराती, परिसर आणि वाहनांवर योग्य शाही मोहर प्रदर्शित करण्याचा अधिकार देतो. काही कंपन्यांसाठी, त्यांचे उत्पादन विकण्यासाठी रॉयल एंडोर्समेंट हा एक शक्तिशाली पर्याय आहे.

या कंपन्यांना मिळाले होते रॉयल वॉरंट

फोर्टनम आणि मेसन हे राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स यांचे आवडते चहा उत्पादन होते. या कंपनीला १९५४ साली रॉयल वॉरंट मिळाले होते. फोर्टनम आणि मेसन यांनी १९०२ मध्ये किंग एडवर्ड VII साठी रॉयल ब्लेंड चहा बनवला होता.

ट्विनिंग्सकडे राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या चहा आणि कॉफीसाठी रॉयल वॉरंट होते.

बर्बेरी रेनकोटकडे राणी एलिझाबेथ आणि त्यांच्या ज्येष्ठ पुत्रासाठी वॉटरप्रूफ आणि सिक्युरिटी-प्रूफ रेनकोट बनवण्यासाठी रॉयल वॉरंट आहे.

अ‍ॅपलचे वेड! IPhone 14 Pro खरेदीसाठी त्याने गाठली दुबई; तिकीटाच्या पैशात आले असते दोन भन्नाट फोन

१९६८ पासून आजपर्यंत राणीला हँडबॅग पुरवल्याचा अभिमान बाळगणाऱ्या लॉनर कंपनीला आता आपली मौल्यवान बाजारपेठ गमावण्याची भीती आहे.

हेन्झ आणि केलॉग या ब्रँडकडेही रॉयल वॉरंट्स आहेत. हेन्झ, हे त्याच्या केचप आणि भाजलेल्या सोयाबीनच्या टिनसाठी प्रसिद्ध असून ब्रिटनच्या लोकांचे ते आवडते आहे. त्याच वेळी, केलॉग कंपनी राणी एलिझाबेथच्या ७० वर्षांच्या कारकिर्दीत राजघराण्याला सातत्याने केलॉग्सचा पुरवठा करत आहे. यूकेमधील ब्रँडचे प्रवक्ते पॉल व्हीलर म्हणाले, “आमच्याकडे जीनेव्हीव्ह नावाची एक विशेष व्हॅन होती, जी थेट कारखान्यातून रॉयल्सपर्यंत केलॉग्स पोहोचवत होती.”

रॉयल वॉरंट केवळ पाच वर्षांसाठी वैध असतात. त्याचे नूतनीकरणाचे नियम अत्यंत कडक आहेत. या कंपन्यांना केवळ दर्जेदार सेवेच्या आधारावर रॉयल वॉरंट दिले जात नाही, तर यामध्ये मानवाधिकारांशी संबंधित विश्वासही महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the death of queen elizabeth ii 600 companies including cadbury became concerned know what is the reason behind it pvp