सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. सध्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक तरुणी दुचाकीवर बसून झोमॅटोच्या पदार्थांची डिलिव्हरी करण्यास निघाली आहे. फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे (Zomato) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) दीपिंदर गोयल यांनी हा व्हिडीओ पहिला आणि त्यांनी ट्विट करून या प्रकरणाचा खुलासा केला आहे; जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इंदूरमधील विजयनगरचा आहे; ज्यात एक तरुणी दुचाकीवर बसली आहे. तसंच ती एक मॉडेल आहे, असं सांगण्यात येत आहे. ही तरुणी लाल रंगाचे कपडे घालून पाठीवर झोमॅटो कंपनीची बॅग घेऊन डिलिव्हरी करण्यास निघाली आहे. रस्त्यावर ये-जा करणारे प्रवासी अगदी कौतुकानं तिच्याकडे बघताना दिसत आहेत. अगदी झोमॅटो डिलिव्हरी बॉयप्रमाणे तरुणी ऑर्डर पोहचवण्यासाठी निघाली आहे, असा हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. पण, हे पाहून फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचे सीईओ (CEO) दीपिंदर गोयल यांनी ट्विट करून या प्रकरणाचा खुलासा केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय लिहिलं आहे एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
पोस्ट नक्की बघा :
झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांचे ट्विट :
व्हायरल व्हिडीओ @rajivmehta या युजरने शेअर केला होता. या युजरची पोस्ट रिट्विट करून झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी लिहिलेय, “आमचा या व्हिडीओशी अजिबात संबंध नाही आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना आम्ही मान्यता देत नाही आणि इंदूरमध्ये आमचे मार्केटिंग हेड नाही आहे.”
तसेच आमच्या कंपनीच्या नावाचा उपयोग करून मोफत प्रवास (फ्री रायडिंग) केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे दीपिंदर गोयल म्हणतायत, “महिलांनी डिलिव्हरी करणे काहीही चुकीचे नाही आहे. पण, आमच्याकडे शेकडो स्त्रिया अशा आहेत की, ज्या त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी पदार्थांची डिलिव्हरी करतात आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे.” सीईओ दीपिंदर यांनी कोणालाही न दुखावता, त्यांची बाजू मांडली आहे आणि या प्रकरणाचा खुलासा केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rajivmehta यांच्या अकाउंटवरून व्हायरल झाला आहे; तर या प्रकरणाचे स्पष्टीकरण झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी @deepigoyal यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केलं आहे. तसेच झोमॅटो सीईओचे ट्विट पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. तसेच झोमॅटोचे सीईओ यांनी यावर त्यांचं मत स्पष्टपणे मांडल्यामुळे अनेक जण त्यांची प्रशंसा करताना दिसले आहेत.