Viral news: लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा, या टप्प्यावर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत आपलं आयुष्य शेअर करणं ही संकल्पना असते. ही संकल्पना मागच्या काही काळात बदलत चालली आहे. आपला जोडीदार निवडताना तरुण वर्ग त्याबाबत बराच वेगळा विचार करताना दिसत आहे.हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता, शेती वा नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यांवरच हल्ली लग्न ठरत असल्याची परिस्थिती दिसून येते. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुणे-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडूनही व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. मुलाच्या पगारावरून हल्ली लग्न ठरवलं जातं. दरम्यान, असंच एक प्रकरण समोर आलं आहे. त्यामध्ये मुलानं पगारातला एक शून्य चुकून वाढवून सांगितला आणि नंतर खरं सांगितल्यावर तरुणीनं त्यांचं लग्नच मोडलं आहे. या दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे चॅट वाचा आणि तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी तरुणाची चूक आहे की तरुणीची.

पगारातला एक शून्य कमी झाला अन् तरुणीनं थेट लग्नच मोडलं

आता तुम्हालाही प्रश्न पडला असे,ल की नेमकं प्रकरण काय? तर एक तरुण विवाह नोंदणीच्या एका प्लॅटफॉर्मवर एका तरुणीशी गप्पा मारत होता. दोघांचीही लग्नाबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, मुलानं त्याचा वार्षिक पगार ३० लाख रुपये असल्याचं सांगितलं. आता एवढा पगार असल्यावर कोणती मुलगी नाही म्हणेल; त्याप्रमाणेच त्या तरुणीनंही होकार दिला. एवढा पगार ऐकून ही तरुणी कधी साखरपुडा करायचा, असं म्हणत तरुणाच्या मागेच लागली. तेवढ्यात मुलाला आपली एक चूक लक्षात आली. त्यानं प्रोफाईलमध्ये वार्षिक पगारात एक शून्य जास्त लिहिला होता. खरं तर त्याचा पगार तीन लाख रुपये आहे; पण त्यानं चुकून ३० लाख रुपये पगार लिहिला होता. अन् हा एक शून्य कमी होताच त्या तरुणीनं थेट लग्नच मोडून टाकलं. दरम्यान, दोघांमध्ये झालेल्या चॅटिंगचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हीही गोंधळून जाल.

नेमकं प्रकरण काय?

दरम्यान, या प्रकरणाची खरी बाजू अशी की, हा तरुण मुद्दाम हे सगळं बोलत होता. त्याला ३० लाख एवढाच पगार होता. मात्र, तरुणीची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तरुणाला आपण चुकीच्या जोडीदाराची निवड करतोय हे लक्षात आलं आणि त्यानं तिला सगळं सांगितलं. त्यानंतर तरुणीची आईही तरुणाला धमकावू लागली. त्यावर त्या तरुणानं न घाबरता, तुम्हाला जे करायचं आहे, ते करा, असे म्हणत या तरुणीची खरी बाजू सगळ्यांसमोर आणली. तसेच तरुणीचं हे दुसरं लग्न असून, आधीच्या नवऱ्यालाही तुम्ही असंच फसवलं असेल, असा आरोप हा तरुण करताना दिसत आहे.

पाहा व्हॉट्सअॅप चॅट

हेही वाचा >> PHOTO: ‘तो दिसताच त्याला हाकलून द्या’ नवरदेवानं लग्न पत्रिकेत लिहली अजब सूचना; लग्नपत्रिका वाचूनच घाबरले पाहुणे

मुलांची कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते हे दाखविण्यासाठी तरुणानं त्यांचं पर्सनल चॅट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकरी याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपली मतं मांडत आहेत.