Terrifying Video: अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही अपघात पाहून खूप भीती वाटते. अशा अपघातांमध्ये काहींना गंभीर दुखापत होते तर काही जण आपल्या जीवाला मुकतात. अपघात कुठेही कसाही होऊ शकतो, त्यामुळे नेहमी सावधगिरी बाळगणं आणि सुरक्षित ठिकाणी राहणं हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे. अनेकदा नकळत का होईना आपणच आपला जीव धोक्यात घालतो आणि याचा त्रास अनेकदा कुटुंबाला सहन करावा लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरा बायकोचं नातं अगदी पवित्र मानलं जातं. यात एकाला जरी खरचटलं तरी याचा त्रास दुसऱ्याला होतो. आपल्या जोडीदाराविषयीची हीच काळजी म्हणजे खरं प्रेम. पण, आपल्याच डोळ्यासमोर जर आपल्या जोडीदाराचा मोठा अपघात झाला तर नक्कीच कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. सध्या असाच एक अपघात एका महिलेचा झाला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण, हा अपघात पाहून तिचा नवरा रडत बसला नाही तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्याने तिला वाचवायचा प्रयत्न केला. नेमकं असं घडलं तरी काय? जाणून घेऊ या.

हेही वाचा… आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला छतावरून कोसळताना दिसतेय. उंचावरून कोसळताच महिलेचं डोकं जोरात आपटतं आणि ती खाली कोसळते. क्षणाचाही विलंब न करता तिचा नवरादेखील छतावरून उडी मारतो आणि बायकोला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतो.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @billionairephase या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “एक स्त्री छतावरून पडली आणि तिच्या पतीने तिला मदत करण्यासाठी उडी मारण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही”, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला तब्बल ३.९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा… आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो तिच्यावर त्याच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “देवाचे आभार मानतो की तो तिथेच ओरडत किंवा रडत बसला नाही आणि त्याने लगेच निर्णय घेतला”, तर तिसऱ्याने “तिला वेदनेने रडताना पाहून त्याला जास्तच वेदना झाल्या असाव्यात” अशी कमेंट केली. “प्रेमाची ताकद”, अशी कमेंटदेखील एका युजरने केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After the woman fell from the roof her husband jumped in to save her viral video on social media of husband wife love dvr