Viral Video : रस्त्यावरील किंवा दुकानातील चटपटीत खाद्यपदार्थ नेहमीचं सगळ्यांना आकर्षित करतात. तसेच यातील काही पदार्थ खाणं शरीरासाठी किती घातक असतात याचे महत्त्व अनेकदा आई-बाबा किंवा डॉक्टर आपल्याला सांगतात, पण आपण तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण, जेव्हा सोशल मीडियावर कारखान्यातील या पदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होतात तेव्हा आपल्याला कळतं की, हे खाद्यपदार्थ कुठे आणि कोणत्या पद्धतीने बनवले जातात. तर आज सोशल मीडियावर फ्रूट केक कसा बनवला जातो याची एक झलक दाखवण्यात आली आहे; जे पाहून तुम्ही फ्रूट केक खाताना एकदा तरी विचार कराल…
व्हायरल व्हिडीओमध्ये फ्रूट केक (Fruit Cake) कसा बनवला जातो याची झलक दाखवण्यात आली आहे. एक व्यक्ती केकसाठी पीठ तयार करत असल्याचे दिसून येते आहे. केक बनवणारा कामगार हाताने तयार केलेलं मिश्रण मिक्स करताना दिसतो आहे. कामगार अनेक अंडी फोडून बादलीत टाकतो आहे. तसेच हे तयार करण्यात आलेलं मिश्रण बादलीमधून हातानेच ट्रेमध्येसुद्धा टाकण्यात आलं आहे, जे पाहून तुम्हाला खूप विचित्र वाटेल. कारखान्यात फ्रूट केक कसा तयार केला जातो एकदा व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघाच…
हेही वाचा… VIDEO : पिंजऱ्याची कडी काढून महिलेच्या अंगावर धावले माकड, व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
व्हिडीओ नक्की बघा :
हाताने बनवलं मिश्रण :
फ्रूट केकसाठी तयार केलेलं मिश्रण एका स्टीलच्या बादलीत तयार केलेलं तुम्हाला दिसेल. कामगार हे पीठ मिक्स करून घेण्यासाठी कोणतेही यंत्र वापरत नाही किंवा कोणत्याही साधनांचा वापर करत नाही, तर चक्क हाताने हे पीठ तयार करून घेत आहे. व्यक्ती एका बादलीत तयार केलेलं पीठ हाताने गोल गोल फिरवतो आणि नंतर हाताला चिकटलेलं पीठ काढून त्याच बादलीत टाकतो. त्याचप्रमाणे तो हाताने अंडी फोडून पिठात टाकतो. त्यानंतर केकचा बेस तयार करण्यासाठी बादलीतील मिश्रण हातानेच ट्रेमध्ये काढून घेतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodbowlss या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कारखान्यात फ्रूट केक बनवताना’ असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेक जण, ‘आजपासून केक खाणं बंद करणार’, ‘कामगाराच्या हाताद्वारे नैसर्गिक मीठ पिठात मिक्स होतंय’ असे काही युजर म्हणत आहेत. तसेच काही जण मिश्रण बनवण्यासाठी चमचा किंवा इतर साधनांचा तुम्ही उपयोग का करत नाही? असे प्रश्नसुद्धा विचारताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.