Virat Kohli : विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या खेळांडूपासून चाहत्यांपर्यंत सर्वांचीच निराशा झाली.अशातच विराट कोहली आणि अनुष्काचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का विराटला मीठी मारताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट आणि अनुष्काचे लाखो चाहते आहेत. विश्वचषक २०२३च्या जवळपास सर्वच सामन्यात अनुष्का स्टेडियमध्ये उपस्थित होती. विराटच्या चौकार, षटकारवर टाळ्या वाजवताना दिसली.एवढंच काय तर विराटने न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड मोडत शतकांची हाफ सेंच्युरी केली आणि नवा विक्रम आपल्या नावे नोंदवला यावेळी सुद्धा अनुष्काचा आनंद गगनात मावेनासा होता. आता पराभवानंतर सुद्धा ती विराटला धीर देताना दिसत आहे.

Viral Video
Viral Video : “प्रत्येक गुजराती एलॉन मस्क आहे”, कॅनडामध्ये वीज बचतीचा ‘देसी जुगाड’ पाहून नेटकरी हैराण
Mahakumbh mela man walking from outside of the bridge shocking stunt video viral
“अरे, स्वत:च्या जीवाची तरी पर्वा करा”, कुंभमेळ्यात माणसाने…
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kalyan Viral Video
“कल्याणकरांचं आयुष्य सोपं नाहीय”, कल्याण स्टेशनवरचा ‘तो’ जीवघेणा प्रकार पाहून धक्का बसेल; VIDEO एकदा पाहाच!
little boy dance
“कडक रे बारक्या…” लावणीच्या तालावर चिमुकल्याने धरला ठेका; सगळे पाहतच राहिले… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “लावणीसम्राज्ञी याच्यासमोर फिक्या”
railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral
shocking video
VIDEO : चूक कोणाची? रस्त्याच्या मधोमध चालत होत्या आजीबाई, भरधाव वेगाने धावणाऱ्या बसने.. व्हिडीओ होतोय व्हायरल
Girls Kidnapped Fact Check video
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तीन मुलींचे अपहरण; अपहरकर्त्याच्या तावडीतून तरुणाने केली सुटका? पण VIDEO तील घटनेचं सत्य काय, वाचा

हेही वाचा : Cricket Dance : क्रिकेट डान्स पाहिला का? पाहा हा अनोखा डान्स प्रकार, व्हिडीओ होतोय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की विराट मैदानावर असतो. तेव्हा त्याला दूरवर उभी असलेली त्याची पत्नी अनुष्का दिसते तेव्हा तो अनुष्काला भेटायला जातो अनुष्का त्याला घट्ट मिठी मारत त्याला सांत्वन करताना दिसते. हा भावनिक व्हिडीओ पाहून कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

viratxankit_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मिठी मारल्यामुळे बरं वाटतं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “प्रेम” तर एका युजरने लिहिलेय,”ती नेहमी त्याच्याबरोबर असते” आणखी एका युजरने लिहिलेय, “विरुष्का” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader