Agari Koli Womens Protest Saree Giving Tradition Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि तितकाच आनंदाचा क्षण असतो. हा क्षण नवरा-नवरीप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांसाठीदेखील तितकाच आनंद अन् उत्साहाचा असतो. त्यामुळे एकदा का लग्नाची तारीख ठरली की, साखरपुडा पार पडल्यानंतर लग्नघरात सजावट, जेवण कसे असेल इथपासून ते नवरी-नवरीचे दागिने, कपड्यांपर्यंत सर्वांविषयी चर्चा सुरू होते. पण, लग्नात नवरा-नवरीच्या कपड्यांपेक्षा मानपानाच्या साड्यांचा विषय हा खूप मोठा असतो, विशेषत: आगरी-कोळी समाजात फक्त लग्नच नाही, तर प्रत्येक शुभ कार्यात महिलांना साडी देण्याची परंपरा आहे, जी मोठी खर्चिक परंपरा आहे. त्यामुळे लग्नापेक्षा यासाठी सर्वाधिक पैसा खर्च होतो जो प्रत्येकालाच परवडण्यासारखा नसतो. त्यामुळे ही परंपरा बंद करण्यासाठी उरणमधील कोपर गावातील महिलांनी अनोखे आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये आगरी कोळी समाजाच्या काही महिला हातात बॅनर घेऊन रस्त्यावर उतरून, ‘बंद करा, बंद करा साड्यांचा आहेर बंद करा’ अशी घोषणा देत प्रत्येक कार्यक्रमात साडी देण्याच्या परंपरेला विरोध दर्शवीत आहेत. दरम्यान, व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्येही अनेकांनी या आंदोलनास समर्थन दिले आहे.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
dance of women on Zapukzhupuk
‘आरारारा खतरनाक…’ चाळीतल्या महिलांचा झापुक झुपूक गाण्यावर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

लग्नसमारंभासह प्रत्येक कार्यक्रमात साड्या देण्याच्या प्रथेस विरोध

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आगरी व कोळी समाजातील शेकडो महिला हातात बॅनर्स घेऊन गावात प्रत्येक कार्यक्रमात साड्या देण्याच्या प्रथा परंपरेला तीव्र विरोध करीत आहेत. यावेळी काही महिलांच्या हातात बॅनरदेखील दिसत आहेत ज्यावर ‘बंद करा, बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा’ असे लिहिले आहे. तसेच, आंदोलनातील महिलादेखील तीच घोषणाबाजी करत आहेत. या कोपर गावातील महिलांनी आता एकमताने लग्न, पूजा, ओटभरणी अशा कार्यक्रमांना साड्या घ्यायच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे अनेकांनी स्वागतच केले आहे आणि अनेकांनी साड्यांप्रमाणे सोने, मेकअपवर यावरही बंदी आणली पाहिजे, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.

हेही वाचा – VIDEO : रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की, पाहून अनेकांना झाली वडिलांच्या कष्टाची जाणीव; लोक म्हणाले, “लाखात एक…”

एकूणच आगरी व कोळी समाजात प्रत्येक कार्यक्रमात मानपानाच्या साड्यांसाठी भरमसाट खर्च होतो, जो अनेक कुटुंबांना न परवडणारा असतो. त्यामुळे ही साडी देण्याची प्रथाच बंद व्हावी यासाठी महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे.

तुमच्या गावाने पण असा निर्णय घेतला पाहिजे का?

या अनोख्या आंदोलनाचा व्हिडीओ agri.kolii नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमच्या गावानेपण असा निर्णय घेतला पाहिजे का? आगरी व कोळी समाजात प्रत्येक कार्यक्रमाला साडी देण्याची परंपरा आहे, जी मोठ्या खर्चाला कारणीभूत ठरते. कोपर गावातील महिलांनी ही प्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला; ज्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होईल. तुम्हाला हा निर्णय कसा वाटला, ते नक्की कमेंट करून सांगा.

दरम्यान, अनेकांनी कमेंट्समध्ये ही प्रथा बंद व्हावी, असे मत मांडले आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, सोन्यावरही सगळीकडे अशीच बंदी घातली पाहिजे, ज्यामुळे सोनं स्वस्त होईल आणि लग्नात गरिबांना खरेदी तरी करता तरी येईल. दुसऱ्या युजरने लिहिले की, या सुंदर निर्णयाबद्दल सर्व महिलांचे हार्दिक अभिनंदन!

तिसऱ्या एका युजरने साड्यांच्या आहेराविषयीची सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याने कमेंटमध्ये लिहिले की, ज्या साड्या आहेर म्हणून मिळतात किंवा आपण दुसऱ्यांना देतो त्या हलक्या प्रतीच्या असल्यामुळे महिलांना वापरता येत नाहीत. तसेच लग्नात पुरुषांनाही कपड्यांचा आहेर दिला जातो. तोही शिवून वापरण्यासारखी नसतो म्हणून पर्यायी ते आपण दुसऱ्यांना आहेर देता येईल म्हणून ठेवतो, तसेच वापरण्यायोग्य कपडे घेण्यासाठी ५०० रुपये तरी लागतात. चौथ्या एका युजरने लिहिले की, अगदी योग्य निर्णय… हाच उपक्रम सर्व गावांत राबवला पाहिजे.

पाचव्या एका युजरने लिहिले की, साड्यांचा आहेर बंद करून रोख पैसे आहेर म्हणून दिले, तर त्यांना थोडीफार मदत होईल. दरम्यान, हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हा निर्णय पटतोय का ते आम्हाला कमेंट करून सांगा.

Story img Loader