”Joy Knows No Age Grandparent Viral Dance Video : म्हणतात ना आयुष्य खुप संदर आहे फक्त ते आनंदाने जगता आलं पाहिजे! आयुष्यात अनेक चढ-उतार येतात त्यांचा सामाना धैर्याने करावा लागतो पण आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला विसरले नाही पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टीतच तर आयुष्याचा खरा आनंद दडलेला असतो. पहिल्यांदा आई-वडील कौतूक करतात तो क्षण, पहिल्यांदा नोकरी लागते तो क्षण, पहिला पगार हातात येतो तो क्षण, पहिल्या पगारातून आई-वडीलांसाठी काहीतरी खरेदी करतो तो क्षण, पहिल्यांदा हक्काचं घर खरेदी करतो तो क्षण, पहिल्यांता स्वत:ची हक्काची गाडी खरेदी करतो तो क्षण….असे कित्येक छोटे मोठे क्षण आपण आपल्या आयुष्यात पाहतो. या क्षणांचा आनंद काही वेगळाच असतो. असाच छोटासा आनंद जगणाऱ्या आजी-आजोबांचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

आयुष्यात सर्वजण स्वप्न पाहतात पण कोणाची स्वप्न पूर्ण होतात तर कोणाची नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे कारण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची कसलीही मर्यादा नसते. हे आजी आजोबांनी सिद्ध करून दाखवले आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये एका आजोबांनी एक वयस्कर जोडप्याने कार खरेदी केली आहे. स्वत:च्या मालकीची कार खरेदी करण्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. दोघेही आनंदाने नाचताना दिसत आहे.

हेही वाचा –“याला म्हणतात संस्कार!” चार वर्षाच्या चिमुकल्याने केली शिवगर्जना! व्हिडीओ पाहून येईल अंगावर शहारा

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर lay_bhari_official नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”आयुष्यात पहिली स्वत:ची गाडी घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो!”

Viral Videoवर कमेंट करत अनेकांनी वृद्ध जोडप्याचे कौतूक पूर्ण केले. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले,”खुप सुंदर व्हिडिओ आहे,प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.”

हेही वाचा – पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरवर चढून नाचणाऱ्या आजींचा नवा Video चर्चेत, “बुगडी माझी सांडली गं”गाण्यावर सादर केली लावणी

आजी-आजोबांनी हा व्हिडिओ पाहून अनेकांना प्रेरणा मिळते आहे. एकाने लिहिले की, “खुप सुंदर. मला ही JCB machine घ्यायचे आहे. त्याचं मशीनमध्ये बसून आम्ही नवरा बायको घरी येऊ. लवकरच हे स्वप्न पूर्ण होईल.”

दुसऱ्याने लिहिले की, “आनंद स्वप्नांनपलीकडचा”

तिसऱ्याने लिहिले की, “त्यांचा आनंद बघून मन खरचं खूप आनंदी झाले”