Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेकांचे डान्स करतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध जोडपे बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
असं म्हणतात, वय हा फक्त आकडा आहे. जीवनात लहान लहान गोष्टींचा आनंद घेताना वयाचा विचार करू नये. मनसोक्त जगावे आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा. सध्या हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालाही या वृद्ध जोडप्याचे कौतुक करावेसे वाटेल.
या व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत स्टेजवर उभे राहून एक वृद्ध जोडपे बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गोविंदा आणि नीलम यांचे सुपरहिट गाणं ‘आप के आ जाने से ‘ या गाण्यावर हे जोडपे खूप सुंदररित्या डान्स करताना दिसत आहे. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कुणालाही त्यांच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही, एवढा सुरेख ते डान्स करताना दिसतात. विशेष म्हणजे ते डान्स करताना मनसोक्त आनंद घेताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की जीवनाचा आनंद घेताना कधीही वय आडवे येऊ नये. त्यांची ऊर्जा खरोखरच थक्क करणारी आहे.
हेही वाचा : थंडीत मुक्या जीवांचा विचार करा! शेकोटीसमोर बसून थरथर कापणाऱ्या कुत्र्यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल
theecdcweddingchoreography या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जेव्हा घरातील मोठे स्टेजवर उतरतात तेव्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “वय हा फक्त आकडा असतो” तर एका युजरने लिहिलेय, “या महिलेचे हावभाव पाहा..अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह, जोडपं असावं तर असं” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.