Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने व्हिडीओ शेअर करत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही वृद्ध लोकं मैदानात उतरलेली दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून त्यांच्या आजी आजोबांची आठवण येऊ शकते.
आजवर तुम्ही लहान मुलांना किंवा विशिष्ट वयोगटातील तरुणांना मैदानावर विविध खेळ खेळताना पाहिले असेल पण तुम्ही कधी वृद्ध लोकांना मैदानावर खेळताना पाहिले आहे का? या व्हिडीओमध्ये एका मोठ्या स्टेडियममध्ये होऊ घातलेल्या स्पर्धेत वृद्ध लोक सहभागी झालेले दिसत आहे. हे वृद्ध लोक विविध खेळ खेळताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हीही भारावून जाल.
हा व्हायरल व्हिडीओ एका मैदानावरील आहे. या व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे मैदानावर वृद्ध लोकांच्या स्पर्धा रंगल्या आहेत. व्हिडीओत तुम्हाला एक आजी धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेली दिसत आहे. ती हळूहळू धावताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत दिसते की एक आजोबा गोळा फेकताना दिसत आहे. त्यानंतर लेहेंगा घालून आणि डोक्यावर ओढणी ओढून एक आजी गोळा फेकताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ज्येष्ठ नागरिक खेळात रमताना पाहून तुम्हालाही त्यांचे कौतुक करावेसे वाटेल. ही स्पर्धा खास ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेली होती, असा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा : धक्कादायक! भरधाव वेगाने बाईक चालवणे पडले महागात, क्षणात झाले होत्याचे नव्हते; व्हिडीओ होतोय व्हायरल
physicaleducationwithanil या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलेय, “वय हा फक्त आकडा आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला भारतीय असल्याचा अभिमान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “जुने ते सोने” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान” अनेक युजर्सनी व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्स त्यांच्या उत्साह पाहून अवाक् झालेले दिसत आहे.