उत्तर प्रदेशमधील आग्रा इथला एक भयानक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या पत्नीला खांबाल बांधून ठेवून तिला काठीने मारहाण करत आहे. पतीने केलेल्या मारहाणीला कंटाळून महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. संतापलेल्या पतीने उघडपणे हे कृत्य केले. पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी पतीने घटनास्थळावरून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा तपास घेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना पोलीस स्टेशन सिकंदरा परिसरातील आरसेना गावातील आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती श्याम बिहारी आणि महिलेची सासू बर्फा देवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. १४ जुलै रोजी ही घटना घडली आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या मेट्रोत मुलगी अचानक डान्स करू लागली, प्रवासी बघतच राहिले

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील रहिवासी असलेल्या कुसुमा देवी यांचा विवाह १७ वर्षांपूर्वीच अर्सेना गावातील रहिवासी श्याम बिहारीसोबत झाला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार पती ती खूप मद्यपान करतो. तिने विरोध केल्यावर तो तिला मारहाण करतो. १३ जुलै रोजी सुद्धा तिच्या पतीने प्राणघातक हल्ला केला होता. याबाबत तिने पोलिसांकडे तक्रार केली होती. कुसुमा घरी परतल्यावर तिच्या पतीने क्रूरतेचा कळस गाठला. आरोपींनी कुसुमाला खांबाला बांधून काठीने मारहाण केली. कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केलाय.

आणखी वाचा : विमानात प्रवासी लक्ष देत नव्हते म्हणून या फ्लाईट अटेंडंट्सने असं काही केलं की…; पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : याला म्हणतात खरं प्रेम! आजी-आजोबांचा VIRAL VIDEO तरुणाईत एकदम हीट!

पीडित महिला कुसुमा देवी सांगतात की, पती श्याम बिहारी तिला बऱ्याच दिवसांपासून मारहाण करत आहे. दुसरीकडे सीओ हरिपर्वत यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील देण्यात आलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agra viral video husband brutally beats wife tied pole up police prp