मुंबई शहर ज्या कारणांसाठी ओळखले जाते त्यापैकी एक म्हणजे येथील पाऊस. पावसळ्यात जी मुंबईची अवस्था होते ती दरवर्षी आपण पाहतो. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचते. लोकांना जीव मुठीत घेऊन अक्षरक्ष: रस्त्यावरून पोहत जा-ये करावी लागते. संपूर्ण मुंबईत, विशेषतः भुयारी मार्गांमध्ये पूरसदृश्य स्थिती होणे हे एक सामान्य दृश्य झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांचे जनजीवन विस्कळीत होते आणि काहीवेळा निष्पाप लोकांचे मृत्यूही होतात. शहराचेही प्रचंड नुकसान होते. जवळपास दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात पावसामुळे शहर जाम होते. दरम्यान, पावसाच्या समस्येशी लढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरेच पडतात. तेच तेच उपाय करून आता ही समस्या सुटणार नाही त्यासाठी आता शहरात अशा आधुनिक वाहनांची आवश्यकता आहे जे अशा परिस्थितीमध्ये उपयोगी ठरतील. कल्पना करा की पावसाळ्यांमध्ये मुबंईच्या रस्त्यांवर वाहनांऐवजी बोटी फिरू लागल्या तर? ही कल्पना सुद्धा किती जबरदस्त आहे. याच कल्पनेवर आधारित काही फोटो एका एआय आर्टिंस्ट शेअर केले आहेत जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

AI ने तयार केली आधुनिक वाहने

ही पोस्ट एआय आर्टिस्ट मनोज ओमरे यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. पोस्टमध्ये, त्याने मिडजर्नी सॉफ्टवेअर वापरून “आतापर्यंत मुंबईसाठी ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या” असे कॅप्शन देऊन शेअर केले आहे. या पोस्टमध्ये, या एआय आर्टिस्टने भविष्यतील वाहनांची झलक दाखवली आहे ज्यामध्ये पाण्यावर तरंगणारी, सर्व बाजूने बंद बोटीत लोक बसलेले आहेत. त्या बोटीवर ‘BEST’ असे लिहिलेले आहे, जे मुंबई शहरामध्ये धावणाऱ्या लोकल बसेसवर लिहलेल दिसते.

Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही

हेही वाचा – ऐकावं ते नवलंच! मुलं जन्माला घालण्यासाठी ‘या’ कंपनीची खास ऑफर, कर्मचाऱ्यांना प्रत्येक मुलासाठी मिळणार तब्बल ‘इतके’ लाख!

मुंबईच्या पावसाचा सामना करण्यासाठी भन्नाट कल्पना

दुसर्‍या फोटोत, एक माणूस मोठ्या फुग्यामध्ये असलेल्या स्कूटरवरून पूरग्रस्त रस्त्यावरून प्रवास करताना दिसत आहे. तिसऱ्या चित्रात मुंबईच्या जलमय रस्त्यांवर लाल रंगाचा ट्रेनचा डबा पाण्यावरून जाताना दिसतो आहे ज्यामध्ये बसून लोक पावसाळ्याचा आनंद घेत आहेत. यातील एका फोटोत पाणबुडीही दिसत आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यापासून ७,००० हून अधिकांनी पसंती दर्शवली आहे.

हेही वाचा – बेपत्ता पत्नीचा शोध घेणाऱ्या वृद्धाला करा मदत; १० सेंकदात शोधा फोटोमध्ये लपलेली महिला; ९९ टक्के लोक ठरले अपयशी

थक्क झालेल्या नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

एकाने म्हटले, “चला, हवामान बदलानंतर मुंबई जगातील सर्वात मोठे व्हेनिस होऊ शकते! ते कोस्टल रोड का बांधत आहेत, असा प्रश्न मला पडला होता.” दुसर्‍याने लिहिले, “तुम्ही त्यांच्याकडून खूप तंत्रज्ञानाची अपेक्षा करत आहात.” तिसरा म्हणाला, “आवडले.” एकजण म्हणाला, “हे एलियनसारखे दिसत आहे.”
एकाने सांगितले की, “या पावसाळ्यात वॉटर टॅक्सी, वॉटर कार, वॉटर बससाठी मुंबई पात्र आहे.” एक म्हणाला, “किंवा फक्त उत्तम ड्रेनेज सिस्टम.”