मुंबई शहर ज्या कारणांसाठी ओळखले जाते त्यापैकी एक म्हणजे येथील पाऊस. पावसळ्यात जी मुंबईची अवस्था होते ती दरवर्षी आपण पाहतो. गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचते. लोकांना जीव मुठीत घेऊन अक्षरक्ष: रस्त्यावरून पोहत जा-ये करावी लागते. संपूर्ण मुंबईत, विशेषतः भुयारी मार्गांमध्ये पूरसदृश्य स्थिती होणे हे एक सामान्य दृश्य झाले आहे. त्यामुळे सर्वसामन्यांचे जनजीवन विस्कळीत होते आणि काहीवेळा निष्पाप लोकांचे मृत्यूही होतात. शहराचेही प्रचंड नुकसान होते. जवळपास दरवर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात पावसामुळे शहर जाम होते. दरम्यान, पावसाच्या समस्येशी लढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरेच पडतात. तेच तेच उपाय करून आता ही समस्या सुटणार नाही त्यासाठी आता शहरात अशा आधुनिक वाहनांची आवश्यकता आहे जे अशा परिस्थितीमध्ये उपयोगी ठरतील. कल्पना करा की पावसाळ्यांमध्ये मुबंईच्या रस्त्यांवर वाहनांऐवजी बोटी फिरू लागल्या तर? ही कल्पना सुद्धा किती जबरदस्त आहे. याच कल्पनेवर आधारित काही फोटो एका एआय आर्टिंस्ट शेअर केले आहेत जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा