आर्टिफिशिअल इंटेलिंजेन्सद्वारे तयार केलेल्या फोटोला सोशल मीडियावर खूप पंसती मिळत आहे. नेहमी एआय टुल्स वापरून तयार केलेले फोटो अगदी खरेखुरे असल्याचे वाटते, जे पाहून आपल्या डोळ्यांवर आपल्याला विश्वास बसत नाही. त्याचबरोबर हे फोटो तुम्हाला एक वेगळ्या कल्पनेच्या जगात घेऊन जातात. कधी एखाद्या महान व्यक्तीला अशा स्वरुपात दाखवतात की ज्याचा विचार आपण कधी स्वप्नातही केला नसेल तर कधी वेगवेगळ्या परिस्थितीनुसार आयुष्य कसे असले असते हे दर्शवतात. एआयने तयार केलेले काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये झोमॅटोचे कर्मचारी मुंबईच्या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहे.
झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांनी घेतला
लिंक्डइन युजर सौरभ धाभाई याने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये झोमॅटोचे डिलिव्हरी कर्मचारी मुंबईच्या पावसाचा आनंद घेत आहेत. फोटोमध्ये पाहू शकता की फूड डिलिव्हरी एजेंट कशी प्रकारे मुंबईच्या पावसामध्ये मनसोक्तपण भिजताना दिसत आहे. या फोटोमध्ये एक म्हतारा व्यक्ती आनंदाने पावासात नाचत आहे. तर पावासात भिजणाऱ्या एका महिलेच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य दिसत आहे. एक तरुण पावसामध्ये हे फोटो या गोष्टीची जाणीव करून देताता की पावासात भिजत कशाप्रकारे फूड डिलिव्हरी कर्मचारी आपल्या ग्राहकांची ऑर्डर पूर्ण करतात. पण कधीतरी ते या धो धो पावसाचा आंनद घेऊ शकतात हे दर्शवले आहे. पावासामध्ये भिजणे हे त्यांच्यासाठी त्रासदायक नव्हे तर मजेशीर गोष्ट देखील ठरू शकते असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान एका फोटोमध्ये झोमॅटोकडून येणारे नोटीफिकेशन एका फोटोमध्ये दिसते, ज्यामध्ये ऑर्डर देण्यास उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आहे आणि पावासात भिजत आयुष्याचा आनंद घेत आहे असे सांगितले आहे.”
लोक म्हणाले, खरचं कमाला आहे
सौरभच्या या पोस्टला ६ हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. पोस्टला कॅप्शन देताना लिहिले आहे की,” माफ करा सर, ऑर्डर द्यायला उशीर झाला. थोडसं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होतो. झोमॅटोने असे नोटीफिकेशन पाठवले तर शप्पथ मला फार आनंद होईल”
हेही वाचा – ”तुझी हिंम्मत कशी झाली?”, लेकीला स्पर्श केल्यामुळे प्रवाशावर संतापले वडील; विमानात झाला गोंधळ!
लोक कमेंट करून या फोटोचे कौतूक करत असतात. एका युजरने लिहले आहे की, ”मला मान्य करावे लागले की ही फोटो प्रत्यक्षात खूप कमाल आहेत आणि मी खरचं प्रभावित झालो.” दुसऱ्याने लिहले की, ”हे फोटो पाहून लोक आनंदी होतील आणि त्यांच्या भावना समजू शकतात”