AI Machine Cooking Food Video : महिलांना रोज एकच टेन्शन असतं ते म्हणजे रोज रोज जेवणात नेमकं काय बनवायचं? सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपार, रात्रीच्या जेवणापर्यंत रोज सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. यात सकाळी उठल्यापासून महिलांची खूप जास्त धावपळ असते. मुलांची शाळा, ऑफिस, घरातील आवरा-आवर यात सगळ्यात नाश्त्यापासून डब्ब्याची घाई.. महिला फार थकून जातात. नवनवीन पदार्थ बनवण्याची इच्छा तर फार असते, पण वेळ नसल्याने शक्य होत नाही. पण महिलांनो, आता तुम्हाला सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण बाजारात एक अशी मशीन आलीय, ज्यात तुम्ही काही मिनिटांत सर्व जेवण बनवू शकता. देशातील प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी एक्सवर या भन्नाट मशीनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो आता तुफान व्हायरल होत आहे.

झटपट जेवण बनवणारी मशीन

व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मशीन दिसतेय, जी कोणत्याही अडचणीशिवाय काही मिनिटांत झटपट कोणताही पदार्थ बनवू शकते. या एआय कुकिंग मशीनमध्ये तुम्हाला आधी जो पदार्थ बनवायचा आहे, त्यासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवावे लागते. यानंतर तुम्हाला कोणता पदार्थ बनवायचा आहे हे सेट करावे लागते. अशाप्रकारे काही मिनिटांत तुमचा पदार्थ बनवून तयार होतो.

मशीनमध्ये साहित्य टाकताच कांदा पोहे बनून तयार

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने एआय कुकिंग मशीनमध्ये पोहे बनवले आहेत. यासाठी त्याने एआय मशीनमध्ये पोहे बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य ठेवले, म्हणजे अगदी तेल, पाणी, कांदा, पोहे, मीठ, हळद, साखर, शेंगदाण्यापासून सर्व साहित्य त्यात ठेवलं. यानंतर मोबाईलच्या मदतीने किंवा त्या मशीनवर डायरेक्ट पोह्याची रेपिसी सेट केली, नंतर एआय मशीनने आपोआप पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक एक करून त्यातील पॅनमध्ये टाकण्यास सुरुवात केली. अगदी आपण घरी कांदे पोहे बनवण्यासाठी जी कृती करतो, तीच कृती फॉलो करून मशीनमध्ये कांदा पोहे तयार केले. अगदी काही मिनिटांतच पोहे बनवून तयार झाले. यानंतर त्याने कांदा पोहे चाखून पाहिले, जे चवीला खूपच स्वादिष्ट होते.

हर्ष गोएंकांचा व्हिडीओ व्हायरल

हर्ष गोएंका यांनी दोन दिवसांपूर्वी जेवण बनवणाऱ्या या एआय मशीनचा व्हिडीओ शेअर केला होता आणि जो अद्यापही खूप व्हायरल होतोय. त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “स्वयंपाकाचं भविष्य.” दरम्यान, या व्हिडीओवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, “एक चीन असा देश आहे, जिथे टेक्नॉलॉजीवर काम होते. तिथे दररोज अशा नाविन्यपूर्ण मशीन बनवल्या जात आहेत, ज्या प्रत्यक्षात अनेक समस्या सोडवू शकतात. पण, भारतात मुलं अजूनही स्वयंपाकघरात अडकून आहेत. ते स्वयंपाकघरातून बाहेरच पडत नाहीत.