AI-powered Death Clock : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सध्या सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विज्ञान-तंत्रज्ञान यासोबत आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रातील भविष्यातील शक्यता जाणून घेण्यासाठी देखील कृत्रिम बुद्धिमत्ता वापरली जात आहे. यादरम्यान आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक अ‍ॅप सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘डेथ क्लॉक’ नावाचे हे अ‍ॅप वापरकर्त्याच्या दैनंदिन जीवनातील सवयींच्या मदतीने त्याच्या आयुर्मानाबद्दल अंदाज व्यक्त करते. विशेष बाब म्हणजे जुलैमध्ये लाँच झालेले हे अ‍ॅप तेव्हापासून १२५,००० हून अधिक वेळा ते डाऊनलोड करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप काम कसे करते?

एखाद्याच्या शिल्लक राहिलेल्या आयुष्याबद्दल अंदाज व्यक्त करणारे हे ‘डेथ क्लॉक’ (Death Clock) ब्रेंट फ्रान्सन (Brent Franson) यांनी विकसीत केले आहे. डेथ क्लॉक हे अ‍ॅप १२,०० हून अधिक आयुर्मानासंबंधी अभ्यासांचा विस्तृत डेटाबेस आणि ५३ दशलक्ष सहभागी व्यक्ती यांचा वापरातून हा अंदाज व्यक्त करते. तसेच तुमचा आहार, व्यायाम, तणावाची पातळी आणि झोपेचे पॅटर्न्स या सगळ्यांचा अंदाज घेऊन हे अ‍ॅप तुमच्या मृत्यूची तारखेसंबंधी अंदाज व्यक्त करते.

Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
pune painter death loksatta news
पुणे : तोल जाऊन पडल्याने रंगकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
What is Kinkrant| Sankrant and Kinkrant Difference
Kinkrant 2025: किंक्रांत म्हणजे काय? का पाळला जातो हा दिवस; जाणून घ्या संक्रांत आणि किंक्रांत यातील फरक
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

सध्या या अ‍ॅपला सध्या चांगलीच प्रसिद्धी मिळताना दिसत आहे. डेथ क्लॉक हे अ‍ॅप तुम्हाला कोणत्या सवयी सुधारण्याची आवश्यकता आहे, याबद्दल सल्ला देते. पण या अ‍ॅपचा वापर फक्त मृत्यूची तारीख जाणून घेणे किंवा तुमच्या आरोग्य सुधारणे इतका मर्यादीत नाही, याचे इतरही अनेक उपयोग समोर येत आहेत.

हेही वाचा >> Kerala Rape Case : सावत्र मुलीवर बलात्कार करणाऱ्याला १४१ वर्षांचा तुरुंगवास; जामिनावर सुटल्यावरही पीडितेवर अत्याचार

तुमच्या भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी देखील तुमचे आयुर्मान किती राहिल हे माहिती असणे उपयोगी ठरते. याच्या आधारावर सरकार आणि विमा कंपन्या जीवन विमा आणि पेंशन फंड पॉलिसी कव्हरेजचे मोजमाप करतात. तसेच तुमचे आयु्र्मान किती राहील आणि तुम्ही किती वर्षे निरोगी जगू शकता हे माहिती असल्याने तुम्ही भविष्यातील गुंतवणूक आणि बचत याचा ताळमेळदेखील बसवू शकता. तसेच निवृत्त होताना तुमचे उत्पन्न किती असावे तसेच तुमच्या इतर आर्थिक नियोजनात याचा फायदा होऊ शकतो.

Story img Loader