Air Canada Flight Cancelled After Passenger Requests Blanket : विमानामध्ये अनेकदा प्रवाशांमध्ये मारामारीच्या घटना झाल्याच्या पाहायला मिळतात. काही वेळा प्रवासी असे काही भांडतात की, एकमेकांची डोकी फोडायला मागे पुढे पाहत नाहीत. अशावेळी फ्लाइट अटेंडंट आणि एअर होस्टेस परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात. पण, मोरोक्कोहून उड्डाण केलेल्या कॅनडाच्या एका विमानात असे काही घडले, जे पाहून प्रवासीही शॉक झाले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या विमानात एअर होस्टेस आणि प्रवासी यांच्यात वादावादी झाली. यावेळी एअर होस्टेस प्रवाशांवर चांगलीच संतापली. नंतर प्रकरण इतकं वाढत गेलं की उड्डाण करण्यापूर्वीच विमान रद्द करावं लागलं.

Bike rider accident on Ghodbunder road thane
अपघात होऊन अर्धा तास झाला, पण कोणीही मदतीला आले नाही; घोडबंदर मार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Indigo Flight Video Viral
धक्कादायक! विमान हवेत जाताच लोक बेशुद्ध झाले; इंडिगोच्या विमानात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
iaf Sukhoi fighter plane
नवी मुंबई: डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिले उड्डाण ‘सुखोई’चे, तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या
SpiceJet Flight Delayed
SpiceJet Delayed : “मी रात्रभर थरथरत कापत होते”, स्पाईसजेट विमानाला १२ तास उशीर, मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांची गैरसोय!
Thermal scanning of passengers at Pune airport due to increasing risk of monkeypox pune
पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’! मंकीपॉक्सचा धोका वाढताच आरोग्य यंत्रणांचे पाऊल 
black ribbons, Dombivli to Kasara,
डोंबिवली ते कसारा परिसरातील २० हजारांहून अधिक प्रवाशांचा काळ्या फिती लावून रेल्वे प्रवास
Passenger facing problems despite opening of new terminal at Pune airport
शहरबात : पुणे विमानतळाचं करायचं काय?

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एअर होस्टेस प्रवाश्यावर ओरडताना दिसत आहे. हा संपूर्ण वाद कशामुळे झाला याचे नेमके कारण समोर आलेले नाही. पण, प्रवाशाने तिच्याकडून ब्लँकेट मागितले, ज्यामुळे एअर होस्टेस प्रवाशावर चिडली आणि वादाला सुरुवात झाली असे सांगितले जाते.

व्हिडीओमध्ये ती इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये बोलताना दिसत आहे की, “शिस्तीत राहा, अन्यथा तुला फ्लाइटमधून बाहेर काढेन. मी माझ्या क्रू मेंबर्स विरोधातील कोणतीही गोष्ट सहन करू शकत नाही.” यानंतर ती प्रवाशावर पुन्हा ओरडत म्हणाली की, ‘सर्वांनी सभ्यपणे वागा, शांत राहा, नाहीतर तुम्हाला विमानातून खाली उतरवले जाईल.’

प्रवाशांनी कॅप्टनशी बोलायचे आहे असे सांगितले, तेव्हा एअर होस्टेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि फ्लाइटमधून खाली उतरवू अशी धमकी दिली. यावेळी एअर होस्टेस पुन्हा म्हणाली की, ‘शांत राहा, सीट बेल्ट लावा, नाहीतर खाली उतरवले जाईल.’

एअर कॅनडाने सांगितले की, रविवारी प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यासाठी एक वेगळा क्रू रवाना करण्यात आला. ते म्हणाले की, प्रवाशांना उशीर झाल्याबद्दल आणि फ्लाइट अटेंडंटची वागणूक या दोन्हींसाठी भरपाई दिली जाईल.

एअरलाइन्सचे प्रवक्ते क्रिस्टोफ हेनेबेल म्हणाले की, ‘आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत आहोत. त्याचा आढावा घेतला जात असून आम्ही योग्य ती कारवाई करू. आम्ही आमच्या ग्राहकांची माफी मागतो आणि मनापासून खेद व्यक्त करतो की एअर कॅनडासोबत उड्डाण करताना त्यांचा आजचा अनुभव त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी होता.”