Commuters Jugaad In Indigo Flight Video Viral : गरमीच्या वातावरणात पंखा, एसी आणि कूलरशिवाय राहणं कठीणच असतं. जर काही सेकंदांसाठी पंखा बंद केला, तर असं वाटतं कुणीतरी उचलून आगीवर बसवलं आहे. काही माणसांची तर गरमीमुळे अत्यंत खराब अवस्था होते. मग जरा विचार करा, तुम्हाला भीषण गरमीत जर एक-दीड तास एखाद्या विमानातून प्रवास करावा लागला आणि एसी बंदच पडला, तर काय अवस्था होईल. नक्कीच गरमीमुळे माणसांची अवस्था खराब होते, कारण इंडिगो एअरलाईन्समध्ये प्रवास करणाऱ्या लोकांवर अशीच वेळी आली. परंतु, त्या प्रवाशांनी विमानात थंड हवा मिळण्यासाठी भन्नाट जुगाड केला अन् सर्वांनाच थक्क केलं. इंडिगो विमानातील प्रवाशांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी ५ ऑगस्टला इंडिगो फ्लाईट नंबर 6E7261 मध्ये असलेल्या प्रवाशांना एका वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला. इंडिगो फ्लाईटने चंडीगढ ते जयपूरसाठी उड्डाण घेतलं होतं. आधीच प्रवाशांना १०-१५ मिनिटे कडाक्याच्या उन्हात उभं राहावं लागलं होतं. पण जेव्हा लोक विमानात गेले तेव्हा विमानाच्या एसीत बिघाड झालेला होता. प्रवाशांना वाटलं की, टेक ऑपवेळी एसी सुरु होईल, परंतु,तेव्हाही एसी सुरु झाला नाही. लोकांना विमानात बसण्यापासून लॅंडिंग करण्यापर्यंत भीषण गरमीचा सामना करावा लागला. त्यांना गरमीमुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

इथे पाहा इंडिगो विमानातील प्रवाशांचा भन्नाट व्हिडीओ

कडक कारवाईची मागणी

पंजाबचे कॉंग्रेस अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकांनी कागदाच्या पुठ्ठ्याचा वापर करून हातपंख्याचा आधार घेत थंड हवा मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रवाशांना विमानातील संपूर्ण प्रवास गरमीत करावा लागला, असं अमरिंदर यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. एअर होस्टेसने प्रवाशांना घाम पुसायला टिशू पेपर दिले. महिला आणि मुलं प्रवासात अस्वस्थ झाले. या गंभीर समस्येमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. इंडिगो एअरलाईन्स आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून प्रवाशांना यापुढे अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air conditioners were not working in indigo flight for hours air hostesses shocks after seeing people desi jugaad for cold air nss