प्रत्येकाच्याच आयुष्यात काही खास क्षण येतात. या क्षणांचा आनंद आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. असाच एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गोंडस बाळ विमानामध्ये प्रवेश करताना आपले बोर्डिंग पास केबिन क्रूकडे देताना दिसत आहे. विशेष म्हणजे बाळाचं स्वागत करणारी एअर होस्टेस ही त्या बाळाची आई आहे. हा सुंदर व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही फार आनंद झाला आहे.

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका गोंडस लहान मुलाने हातात बोर्डिंग पास घेतलेला आहे. एमिरेट्स एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी मूल तो पास केबिन क्रूला देते. येथे त्याची आई आहे. एअर होस्टेस आई तिच्या फ्लाइटमधील या लहानग्या पाहुण्याचे स्वागत करते आणि तिच्या मुलाला मिठी मारते.

आई-मुलाचा हा क्यूट व्हिडीओ इन्स्टाग्रामवर flygirl_trigirl नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओचा कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्हीआयपी बोर्डिंगचा आनंद घेतला आणि दुबईला परतलो.’ २४ ऑगस्ट रोजी शेअर केलेला हा व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत ११ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. तसेच आई आणि मुलाच्या या क्यूट व्हिडीओवर नेटिझन्स अनेक प्रेमळ प्रतिक्रिया देत आहेत.

Viral News : चालत्या विमानातच दोन्ही पायलट्समध्ये तुफान हाणामारी; पाहा कसे केले विमानाचे लँडिंग

एका यूजरने कमेंट करत लिहिले, बेस्ट केबिन क्रू. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहले की, या व्हिडीओमुळे माझा दिवस आणखीनच सुंदर झाला आहे. तिसऱ्या युजरने कमेंट करत लिहिले, ‘अरे देवा. किती गोंडस क्षण आहे हा!’ एअर होस्टेस आणि मुलाच्या व्हिडीओने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

Story img Loader