सोशल मीडियावर दररोज अनेक भावनिक, मजेशीर किंवा चीड आणणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडीओ अवघड किंवा तणावाच्या परिस्थितीमध्येही लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारे असतात. त्यातल्या त्यात मागील काही दिवसांपासून विमानातील हवाई सुंदरींनी त्यांच्या डान्सच्या व्हिडीओंनी सगळ्यांना वेड लावलंय. जवळजवळ सोशल मीडिया विमानातील हवाई सुंदरींच्या डान्सच्या व्हिडीओंनी पूर्ण भरलाय. आतापर्यंत तुम्ही विमानात सेवा देणाऱ्या हवाई सुंदरींच्या डान्सचे व्हिडीओ पाहिले असतील. पण आता तर थेट हवाई सुंदरींच्या ट्रेनिंग सेंटरमधलाच एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये हवाई सुंदरी बनण्याचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थीनींनी अफलातून डान्स मुव्ह्स पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून विमानात सेवा देणाऱ्या हवाई सुंदरीच्या डान्स व्हिडीओंचा जणू काही ट्रेंडच आलाय. यात आता आणखी एका नव्या व्हिडीओने भर घातलीय. पण हा व्हिडीओ कोणत्या विमानात डान्स केलेल्या हवाई सुंदरींचा नव्हे तर थेट ट्रेंनिंग सेंटरमध्ये हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींचा आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ स्पाइसजेट एअरलाइन्सच्या एअर होस्टेस उमा मीनाक्षी ट्रेनिंग सेंटरमधला आहे. या ठिकाणी हवाई सुंदरीचे धडे गिरवणाऱ्या मुलींनी चक्क ‘द किड लारोई’ आणि ‘जस्टिन बीबर’ गाण्यावर ठुमके लावले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, वर्गात सर्व मुली आपआपल्या बेंचच्या ठिकाणी उभ्या राहून गाण्यावर थिरकताना दिसून येत आहेत. काही लोक काम करताना दिसून येत आहेत. वर्गातल्याच त्यांच्या एका सहकाऱ्यानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
स्पाइसजेटच्या एअर होस्टेस उमा मीनाक्षी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. या ट्रेनिंग सेंटरमध्ये गेल्या नंतर त्यांनी त्यांच्या मैत्रीणींसोबत थेट वर्गात असतानाच डान्स केला. वर्गात अगदी मधोमध उभ्या असलेल्या एअर होस्टेस उमा मिनाक्षी यांनी ठुमके घेत केलेला डान्स नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ५६ हजार पेक्षा लोकांनी पाहिलाय. तर सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स करत उमा मिनाक्षी आणि त्यांच्या मैत्रिणींनी केलेल्या डान्सचं कौतुक करताना दिसून येत आहेत. उमा मिनाक्षी यांचा यापूर्वी ‘नवराई माझी..’ या गाण्यावरच्या डान्स व्हिडीओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. उमा मिनाझी यांच्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून इन्स्टाग्रामवर त्यांना तब्बल ७६ हजारांपेक्षा जास्त लोक फॉलो करत असतात.
या व्हिडीओमधील भावी हवाई सुंदरीचे हावभाव आणि डान्स मूव्ह सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच पसंत केलं आहे. इतर हवाई सुंदरीच्या डान्स व्हिडीओप्रमाणेच यात त्यांनी हवाई सुंदरी युनिफॉर्म जरी परिधान केलेला नसला तरी त्यांचे डान्स मुव्ह्स पाहून सारेच जण घायाळ होताना दिसून येत आहेत.