Air india express recruitment Mumbai: सध्या देशभरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या राज्यातही सरकारी नोकरीसाठी लाखो तरुण दिवसरात्र धडपड करीत आहेत. सरकारी नोकरी भेटली नाही तरी खासगी क्षेत्रात चांगला पगार देणारी एखादी प्रतिष्ठेची नोकरी मिळावी, अशी अशा घेऊन हे तरुण कष्ट उपसत आहेत. राज्यस तसेच केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक पदांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ उडाल्यामुळे या तरुणांमध्ये हतबलता आलीय. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण आहे. बेरोजगार झालेल्यांमध्ये प्रामुख्याने पदवीधारकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये म्हणावी तितक्या वेगाने आणि सर्वसमावेशक प्रगती झालेली नाही आणि हे बेरोजगारीचे सर्वांत मोठे कारण ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरती ३०० जागांसाठी अन् जमले हजारो तरुण

पदवीधर तरुण आपल्या शिक्षणायोग्य नोकरी पाहतात. मात्र, नवीन नोकऱ्याच निर्माण होत नसल्याने तरुण बेरोजगार होत आहेत. म्हणूनच एखाद्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जात असेल, तर तेथे तरुणाईची झुंबड उडताना दिसतेय. असाच काहीसा प्रकार आज मुंबईतील एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीत पाहायला मिळाला. एअर इंडिया एक्स्प्रेस कंपनीतर्फे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २,७०० जागा भरल्या जाणार आहेत. टप्प्याटप्प्याने ही भरती राबवली जाणार आहे. याच भरतीच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. सुरुवातीला ३०० जागांसाठी परीक्षा घेतली जाणार होती. पण, त्यासाठी तब्बल २५ हजार बेरोजगार तरुण मुले भरतीच्या ठिकाणी आली होती आणि त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. मुंबई एअरपोर्ट गेट क्रमांक ५ बाहेर हा गोंधळ झाला होता.

प्रचंड संख्येमुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरी

मुंबईच्या कालिनामध्ये एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने वॉक-इन मुलाखतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी येथे नोकरी शोधणाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उमेदवारांच्या प्रचंड संख्येमुळे गोंधळ आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर कंपनीने लोकांना त्यांचे सीव्ही देऊन, परिसर रिकामा करण्यास सांगितले. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने अद्याप या घटनेबद्दल आणि भरती प्रक्रियेसंबंधी पुढील कोणतीही घोषणा केलेली नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> माऊलीच्या कष्टाचं चीज केलं! डोंबिवलीतील भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा झाला सीए; आनंद महिंद्रांनी दखल घेत केली खास पोस्ट

काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूच येथे वॉक-इन मुलाखतीच्या वेळीही तरुणांची इतकी गर्दी झाली की अक्षरशः चेंगराचेंगरीची परिस्थिती उदभवली होती. आता मुंबईमध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india mumbai airport air india india express recruitment for 300 post thousands of youngsters gathers video went viral srk
Show comments