Air India Passenger Defecated In Flights: जगातील आघाडीच्या विमान कंपन्यांमधील एक असलेल्या एअर इंडियाच्या विमानांमध्ये प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या अनेक किळसवाण्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यावर कंपनीकडून कठोर कारवाईचे आदेश दिले जात असूनही या घटनांना ब्रेक लागताना मात्र दिसत नाहीत. एअर इंडियाच्या विमानातील एका प्रवाशाला मुंबई-दिल्ली विमानात सीटवर शौच आणि लघवी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. २४ जून रोजी एआयसी ८६६ या फ्लाइटमध्ये ही घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम सिंग नामक प्रवाशी 17F वर बसले होते. प्रथम गैरवर्तन लक्षात आल्यावर त्याला इतरांपासून वेगळे करत केबिन क्रूने प्रवाशाला तोंडी ताकीद दिली पण त्यावर आणखी उद्दामपणे प्रवाशाने लघवी करून थुंकण्याचा सुद्धा प्रकार केला. यादरम्यान, पायलट-इन-कमांडला देखील परिस्थितीबद्दल सतर्क करण्यात आले होते पण विमानाच्या लँडिंगपर्यंत थांबण्याखेरीज गत्यंतर नसल्याने प्रवाशांची कोंडी झाली होती.

लँडिंग झाल्यावर, आरोपी प्रवाशाला स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यासाठी एअर इंडियाचे सुरक्षा प्रमुख उपस्थित होते. भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लील कृत्ये) आणि ५१० (मद्यधुंद व्यक्तीकडून सार्वजनिक गैरवर्तन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एअर इंडियानेही या घटनेवर अधिकृत निवेदन जारी करत “या प्रकारचे वर्तन अस्वीकार्य आहे” अशी भूमिका स्पष्ट केली.

हे ही वाचा<<पायलटने मैत्रिणीसाठी उश्या, दारू आणून कॉकपीटमध्ये सजवली डेट! एअर इंडियाचा मोठा दणका, आता यापुढे…

दरम्यान, आरोपी प्रवासी आफ्रिकेत स्वयंपाकी म्हणून काम करतो. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले जिथे त्याला जामीन मिळाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india passenger defecates urinates on floor spits as air hostess warns dirty man flying from mumbai arrested gets bail svs