Air India Pilot Controversy: एअर इंडियाच्या पायलटने आपल्या खास मैत्रिणीसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी चक्क नियमांनाच धावयवर बसवल्याचा आरोप सध्या चर्चेत आहे. तक्रारीनुसार, कॅप्टनने आपल्या मैत्रिणीला आमंत्रित करण्यापूर्वी कॉकपिट सजवण्याचे आदेश दिले होते. तसेच केबिन क्रूने तिला बिझनेस क्लासमध्ये जेवण द्यावे असेही सांगितले. एअर इंडियाने उपस्थित केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, एअरलाइनला ३ मार्चला क्रूची तक्रार मिळाली होती.

तक्रारीनुसार, AI 915 वर बोर्डिंग करण्यापूर्वीच समस्या सुरू झाल्या. केबिन क्रू वैमानिकांची त्यांची रिपोर्टिंग वेळ होऊन गेल्यावरही वाट पाहत होते वैमानिक प्रवाशांसह विमानात चढले. त्यानंतर, कॅप्टनने क्रूला बिझनेस क्लासमध्ये रिकाम्या जागा असल्यास कळवण्यास सांगितले कारण त्याची एक मैत्रीण इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत होती आणि त्याला तिला अपग्रेड करायचे होते. क्रूने जागा नसल्याचे सांगितल्यावर कॅप्टनने मैत्रिणीला थेट कॉकपिटमध्ये आणण्यास सांगितले आणि तिच्या आरामासाठी बंकमधून काही उशा आणण्यास सांगितले. प्राप्त माहितीनुसार ती मैत्रीण विमानाच्या फर्स्ट निरीक्षक सीटवर बसली होती.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

तक्रारदार क्रू मेंबरने सांगितले की, “कॅप्टनने त्याच्या मैत्रिणीसाठी रूम सजवायला सांगितले, इतकेच नाही तर तिच्यासाठी कॉकपीटमध्येच ड्रिंक्स आणि स्नॅक्सची ऑर्डर सर्व्ह करण्यास सांगितले. कॉकपिटमध्ये अल्कोहोल सर्व्ह करण्यास नकार दिल्यावर पायलट खूप भडकला आणि उद्धटपणे वागू लागला. आणि माझ्याशी मी त्याची नोकर असल्यासारखे वागू लागला.”

DGCA च्या नागरी विमान वाहतूक नियमन (CAR) नुसार सुरक्षित ऑपरेशनसाठी कॉकपिटमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मर्यादित लोकांना आहे. ज्यात विमान ऑपरेटरचा कर्मचारी, ज्याला पायलट-इन-कमांड (PIC) यांचा समावेश होतो. यासाठी विशेष चाचण्या घेतल्या जातात पण याशिवाय कॅप्टनच्या मैत्रिणीने कॉकपीटमध्ये तब्बल १ तासाहून अधिक वेळ घालवला होता. “ती आत असताना, दिल्ली-दुबई सेक्टरवरील प्रवासी सेवेदरम्यान, तिला बिझनेस क्लासचे जेवण आणि स्नॅक्स देण्यासाठी क्रूला अनेक वेळा बोलावण्यात आले. यावेळी एक- दोनदा कॅप्टन स्वतःची खुर्ची सोडून इतर ठिकाणी असल्याचेही दिसले होते” असेही क्रू ने तक्रारीत म्हंटले आहे.

क्रू मेंबरने केलेल्या आरोपानुसार, “माझ्या लक्षात आले की कॅप्टन उशी घेऊन झोपला होता आणि प्रभारी पायलट मागील निरीक्षक स्थानकात प्रवाशाकडे तोंड करून गप्पा मारत बसला होता. कॅप्टनने परतीच्या फ्लाइट दरम्यान तिच्यावर अश्लील टिप्पणी केली होती.

हे ही वाचा<< Apple स्टोअरमध्ये चोरी! ४ कोटींचे आयफोन गायब; मनी हाईस्ट स्टाईलच्या चोरांचा फंडा जाणून व्हाल थक्क

एअरलाइनने अधिकृत निवेदनात सांगितल्याप्रमाणे, “आम्ही नोंदवलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आणि एअर इंडियातर्फे तपास सुरू आहे. आम्ही डीजीसीएला देखील या प्रकरणाचा अहवाल दिला आहे आणि त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत. आमच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेशी आणि आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये आम्ही सतर्क आहोत आवश्यक ती कारवाई केली जाईल”