गुजरातमधील पहिले एयरक्राफ्ट (विमान) रेस्टॉरंट सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. वडोदरा शहरातील तरसाली बायपास येथे हे रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट जगातील नववे विमान थीम असलेले रेस्टॉरंट आहे. हे भारतातील चौथे रेस्टॉरंट आहे जे भंगार विमानाचा वापर करून बांधले गेले आहे.

कसं तयार झालं हे रेस्टॉरंट?

रेस्टॉरंटचे मालक एमडी मुखी यांनी एएनआयला सांगितले की, हे रेस्टॉरंट तयार करण्यासाठी १.४० कोटी रुपये खर्चून बंगळुरूस्थित कंपनीकडून एअरबस ३२० खरेदी करण्यात आले होते. विमानाचा प्रत्येक भाग वडोदरा येथे आणण्यात आला आणि रेस्टॉरंट म्हणून पुन्हा तयार करण्यात आला. सध्या त्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. त्याची क्षमता १०२ लोक बसण्याइतकी आहे.

(हे ही वाचा: YouTube च्या मदतीने तिने घरीच केली स्वत:ची प्रसूती; एकाच घरात राहून पालकांनाही कळलं नाही )

प्रत्यक्ष विमानात बसण्याचा अनुभव

या रेस्टॉरंटमध्ये प्रत्यक्ष विमानात बसण्याचा अनुभव पर्यटकांना मिळेल. वेटर आणि सर्व्हर एअर होस्टेस आणि स्टीवर्डससारखे दिसतात. या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला असे वाटेल की तुम्ही प्रत्यक्षात विमानातून प्रवास करत आहात, कारण वारंवार घोषणाही केल्या जातील.

( हे ही वाचा: “मुलीच्या लग्नासाठी पैसे वाचवण्यापेक्षा…”; भारतीय पालकांना ऑलिम्पिक गाजवणाऱ्या महिला हॉकीपटूचा सल्ला)

असणार विविध पदार्थ

एमडी मुखी यांनी बुधवारी सांगितले की, तुमच्याकडे निवडण्यासाठी भरपूर खाद्य पर्याय असतील. रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, मेक्सिकन आणि थाई पर्याय उपलब्ध आहेत.

Story img Loader