विमानप्रवासात सामान हरवण्याचे किंवा चोरीला जाण्यासारखे वाईट अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. विमानतळावर सुरक्षा अगदी कडक असतानाही प्रवाशांचे सामन हरवणे, दुसऱ्याच विमानात जाणे किंवा चोरीला जाण्याचे प्रकार घडतात तरी कसे? या प्रश्नांचं उत्तर प्रवाशांनादेखील अनेकदा मिळत नाही. काहीवेळा हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी प्रवाशांना खूप मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशातच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी विमानतळावरचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे ज्यात काही कर्मचारी प्रवाशांच्या सामानासोबत छेडछाड करताना दिसत आहे.
Video : जेव्हा छोटी झिवा ‘कॅप्टन कूल’ची काळजी घेते
वाचा : मुंबई पोलिसांचा दिलदारपणा, तक्रारदाराला दिला सुखद धक्का
मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोमबाम बीरेन सिंह यांनी आपल्या ट्विटवर व्हिडिओ शेअर केलाय. ‘विमानात आपलं सामान खरंच सुरक्षित आहे की नाही हे तुम्हीच पाहा’ असं सांगत हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात काही कर्मचारी प्रवाशांचे सामना उघडून त्यात ढवळाढवळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ कोणत्या विमानतळावरचा आहे हे मात्र समजू शकलं नाही. मात्र, प्रवाशांचं सामान खरंच सुरक्षित आहे का यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Our luggage in the flights are safe or not pls see . pic.twitter.com/hIc5irvPba
— N. Biren Singh (@NBirenSingh) October 16, 2017