Airtel Gallery Marathi Language: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, मुंबईच्या चारकोपमधील एअरटेलच्या गॅलरीत कर्मचारी तरुणीचा मराठीतून बोलण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये मराठी येणं गरजेचं नाही, अशी उद्दाम तरूणीची भाषा दिसून येत आहे. सदर घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यात मराठीतून बोलण्याचा आग्रह धरणाऱ्या तरूणाशी तरूणीची हुज्जत घालत होती. यावर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला. दरम्यान यानंतर या तरुणीला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे तसेच तिनं माफीही मागितली आहे. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरच्या गॅलरी येथे काम करणाऱ्या महिला कर्मचारीने मराठीत बोलण्यास नकार देत मराठी तरुणाशी उद्धट वर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला. या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता एअरटेल प्रशासन आणि संबंधित महिला कर्मचारीने या प्रकारावर माफी मागितली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही तरुणी व्हिडीओ कॉलवर मनसे पदाधिकारी महिलेला “मराठी भाषेचा जो अपमान झाला आहे त्याची मी माफी मागत आहे” असं बोलत आहे. यावर महिला पदाधिकारी महिला, तू एक महिला आहेस म्हणून सोडून देते नाहीतर तुझं घर शोधायला आम्हाला वेळ लागणार नाही असं सांगताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
नेमकं काय घडलं होतं?
कांदिवलीतील चारकोपमधील एअरटेल कस्टमर केअरमध्ये एक मराठी तरुण त्याची समस्या घेऊन गेला होता. त्यावेळी तेथील महिला कर्मचाऱ्याने त्याच्याशी उद्धट वर्तन केले. संबंधित महिलेला मराठीतून बोलण्यास सांगितले असता तिने हिंदीतून आरडा ओरडा सुरू केला. त्यानंतर या तरुणाने व्हिडिओ काढला ज्यात त्याने महिलेला नीट बोलण्यास सांगितले त्यावेळी तिने उडवा उडवीची उत्तर दिली. ती वरिष्ठांना सांगत होती की हा व्यक्ती मला सांगतो की महाराष्ट्रात आहात तर मराठी बोलले पाहिजे. त्या तरुणाने मराठीचा आग्रह कायम ठेवला तर त्यावेळी ती हुज्जत घालत म्हणाली की, का आले पाहिजे मराठी, कुठे लिहिले आहे. तसेच त्यानंतर त्याने प्रश्न विचारल्यास त्यास हिंदीमध्ये बोलण्यास सांगितले. मला समजत नाही हिंदींमध्ये बोल असे सांगितले. आपण हिंदुस्थानात राहतो. कोणतीही भाषा बोलू शकतो. मराठी महत्त्वाची नाही आहे.असे म्हटले.