जर तुम्ही सॅमसंगचा J सिरीज मोबाइल विकत घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एअरटेल यूजर्सना सॅमसंग गॅलक्सी जे सिरीज स्मार्टफोनसोबत एक जीबी डेटाच्या किंमतीत १० जीबी ४ जी डेटा मिळू शकतो. एअरटेलच्या जुन्या आणि नव्या युजर्सनाही ही ऑफर उपलब्ध आहे.  यामध्ये २५० रुपयात १० जीबी ४जी डेटा मिळेल. तसेच, ज्या भागांमध्ये ४जीची सुविधा उपलब्ध नाही त्या युजर्सना १० जीबी ३जी डेटा मिळणार आहे. पण १० जीबी ३ जीमध्ये  नऊ जीबी हा नाइट डेटा असेल.
कशी मिळवाल ऑफर –
ही ऑफर मिळवण्याकरिता एअरटेल युजर्सना त्यांच्या सॅमसंग जे सिरीज मोबाईल फोनवरून http://www.offers.airtel.com या संकेतस्थळावर लॉगइन करावे लागेल. त्यानंतर त्यावर दिलेल्या सूचनांनुसार पुढे जावे. ही प्रकिया करत असताना तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट सुविधा चालू असणे गरजेचे आहे. याव्यतिरीक्त ग्राहकांना जवळच्या एअरटेल रिटेल आउटलेट्समध्ये जाऊनही ही ऑफर अॅक्टिव करून घेता येऊ शकते.
भारतीय एअरटेलचे मार्केट ऑपरेशन संचालक अजय पुरी या ऑफरबाबत सांगताना म्हणाले की, प्रसिद्ध सॅमसंग जे सिरीजशी जुडल्याचा आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की या पार्टनरशीपमुळे ग्राहकांना एअरटेल ४जी इंटरनेटचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होईल. ही ऑफर सॅमसंग जे सिरीजच्या काहीच स्मार्टफोनवर उपलब्ध करून देणयात आलेली आहे. सॅमसंग आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी ही ऑफर कोणकोणत्या सॅमसंग मोबाईलवर उपलब्ध असणार ते अद्याप सांगितलेले नाही.

Story img Loader